घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंती

0
118

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य आणि स्वराज्य निर्माण केले – विवेक बोढे

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात शिवजयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी सुराज्य आणि स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्यविस्तार केला त्यांनी आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही अशा सत्तांवर आक्रमणे केली. यातूनच हिंदवी स्वराज्य उभे राहिले. शिवजयंतीनिमित्त मी छत्रपती शिवजी महाराजांना अभिवादन करतो.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, पुजा दुर्गम, गणेश कुटेमाटे, वसंत भोंगळे, श्रीकांत सावे, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, अतुल चोखांद्रे,राजु चटकी, स्वप्नील इंगोले, कोमल ठाकरे, पियुष भोंगळे, मारोती मांढरे, शौर्य बोढे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here