चामोर्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या मागणीची दखल घेत दिना धरणाचे पाणी धान रोवणी करिता आजपासून पाटाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात

0
611

चामोर्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या मागणीची दखल घेत दिना धरणाचे पाणी धान रोवणी करिता आजपासून पाटाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात

चामोर्शी:-गडचिरोली✍️सुखसागर झाडे. 

चामोर्शी तालुक्यात मागिल अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी तालुक्यातील धान रोवणी खोळंबली असून वारंवार शेतकरी बांधव आमदार डॉ देवराव होळी यांना दिना धरणाचे पाणी सोडण्याबाबत विचारणा करीत होते. या तक्रारीची दखल घेत आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली दिना विश्रामगृह मध्ये चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीचे बैठक पार पडली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता मेश्राम साहेब,नॅशनल हायवे अभियंता मिश्रा साहेब, चामोर्शी तालुका पाटबंधारे अभियंता घोलपे , कालवे सल्लागार समितीचे त्रियुगी दुबे , भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे , राजेश्वर चुधरी सरपंच भास्कर पाटील बुरे ,मास्टर काशिनाथ बुरांडे उपस्थित होते कालवे सल्लागार समितीच्या बैठकीनंतर येथील शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन विलंब न करता आमदार डॉ देवराव होळी यांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली. थेट प्रत्यक्ष

दिना धरणावर जाऊन जलपूजन केले व मुख्य अभियंता मेश्राम आणि आमदार डॉ देवराव होळी यांनी दिना धरणाचे गेट व्हील फिरवून पाटा करिता आजपासून पाणी सोडले आजच्या बैठकीत

ठरल्या प्रमाणे सर्वप्रथम मधातील कोणतेही गेट खुले न करता टेलवरील शेतकऱ्यांना पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल व लगेच पाटा वरील मधातिल छोटे गेट सुद्धा उघडले जाणार. यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी दिना पाटबंधारे विभागाच्या पाणी वाटप पथक यांना तमाम शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे. आपापल्या शेतात कोणतेही भांडण न करता सलोख्याने पाणी वाटप करून घ्यावे असे आवाहन केले.आजच्या बैठकीत दिना पाटबंधारे विभागाचे समस्त अभियंता कर्मचारी मजूर व तालुक्यातील शेकडो शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here