युवा संकल्प संस्थेने संस्थेचे नवीन चिन्हं केले प्रकाशित
प्रतिनिधी । युवा संकल्प संस्था गडचिरोली जिल्ह्यामध्ये समाजकार्यासाठी प्रसिद्ध आहे. समाजकार्यात अग्रेसर संस्था म्हणजे युवा संकल्प अश्या नावानी गावागावात प्रख्यात झालेली आहे. त्यात आज होळी या सणाच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेण्यात आले आणि त्यामध्ये आपल्या संस्थेचे जुने चिन्ह बदलून नवीन चिन्ह प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्ये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा नकाशा असून व युवा संकल्प संस्थेचे नाव लिहिलेले आहे. त्याचे कारण असे आहे की,गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये युवा संकल्प ग्रुप चे स्थापना करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण गडचिरोली जिल्हा मध्ये संस्था कार्यरीत असल्याने या चिन्हाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज च्या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्या मा.सौ. कविताताई प्रमोद भगत, उपसरपंच ग्रा.पं.भेंडाळा मा.श्री. विठ्ठलजी सातपुते, पो.पा.भें. मा.श्री. श्रीरंगजी मशाखेत्री, माझी सरपंच ग्रा.पं. भें. मा.सौ.वनिताताई पोरेड्डीवार, ग्रा.पं.भें.स. गंगाजी डांगे, ग्रा.पं.भें.स. मा.निखिलजी उंदिरावाडे, श्री. कवडूजी पाटील सातपुते, युवा संकल्प संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा. राहुल वैरागडे, उपाध्यक्ष मा. चेतन कोकावार, यु.सं.ग्रुप वि. उपप्रमुख मा.देवेंद्र तुंबडे, कबड्डी ग्रुप प्रमुख सुबिर मिस्त्री तसेच संपूर्ण युवा संकल्प सदस्य व गावकरी उपस्थित होते.
