दगडावर पडून डोकं आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू

0
1267

दगडावर पडून डोकं आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू

चामोर्शी (गडचिरोली) सुखसागर झाडे

चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील मय्यत नामे भिमराव केशव खोब्रागडे वय ३० वर्ष हा ५ ऑगष्ट रोज गुरूवार पासून राहत्या घरून निघून गेला होता.घरातील मंडळीने त्याचा इतरत्र शोध सुरूच असताना आज सकाळच्या सुमारास वेलतुर तुकूम हद्दीतील शेताकडे गुरे घेऊन जात असताना देविदास कोहपरे यांच्या शेतात कोणी तरी पडुन असल्याचे दिसले जवळ जाऊन बघितले असता भिमराव खोब्रागडे हा मृत्यूमुखी पडले होते .

 

सदर व्यक्तीचे शेत सुद्धा त्यांच्या शेताला लागून असल्याने सदर बाबीची माहिती मृतकाच्या वडिलास त्यांनी कळवले. मय्यताची पत्नी त्यास सोडून कायमची माहेरी निघून गेल्यापासून मृतक भिमराव खोब्रागडे हा दारूच्या आहारी तुडुंब बुडाला होता. वैवाहिक जीवनात अपयशी झाल्याने आपल्याच विचारात जिवन व्यथीत करीत होता.दारूच्या नशेत रात्रीच्या सुमारास स्व:ताच्या शेताकडे जाताना अंधाराच्या आडोशात कदाचित पायाला ठेच लागल्याने त्याच्या समतोल बिघडून तोंडावर पडल्याने डोक्याला, कपाळाला, नाकाला लागले असून कानातून रक्तस्राव होत जागीच मृत्यु झाला.

 

सदर घटनेची माहिती चामोर्शी पोलीस स्टेशनला मिळताच पो.उप.नि.खुळावले , पो.हवा.गंम्पलवार, ता.म.पो. हुलके, पो.शि.गुंडे यांनी घटनास्थळ गाठत सदर घटनेचा पंचनामा करून बाॅडी ताब्यात घेत शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे नेत उत्तरीय तपासणी करून आप्त नातेवाईकांच्या स्वाधीन केले.मर्ग दाखल करीत पुढील तपास चालू आहे.

सदर घटनेबाबत सर्वत्र हळहळ शोककळा व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here