महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांना जयंतीनिमीत्त अभिवादन
वणी/यवतमाळ, मनोज नवले
महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समिती महात्मा गांधी युवा विचार मंच वणीच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या गांधी चौक स्थित पुतळ्याला व शास्त्री नगर स्थित तैलचित्राला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे मार्गदर्शक श्री कुंतलेश्वर तूरविले ,महात्मा गांधी युवा विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष विकेश पानघाटे,समितीचे समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये,कार्यक्रम प्रमुख स्रुजन गौरकार ,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खूरसाने , राजू पिंपळकर ,इंजि.चैतन्य तूरविले हजर होते.