Il स्वतः साठी एक तास ll 

0
683

Il स्वतः साठी एक तास ll 

राजूरा चंद्रपूर -किरण घाटे -महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं वरील काव्यकुंजच्या मुख्य संयाेजिका तथा राजूरा पतंजलीच्या जेष्ठ सदस्या सराेज हिवरे यांनी स्वता साठी एक तास हा एक लेख शब्दांकित केला आहे .ताे खास वाचकांसाठी आम्ही आज येथे देत आहाे. –प्रातःकाळची आरोग्यदायी हवा… 

सदा सर्वदा मानवते जिवा… 

      प्रसन्नता देई ऋतू तेधवा…. 

सर्व प्राणी मात्रासी….. ll

रोजच्या चोवीस तासापैकी फक्त एक तास आपण स्वतःसाठी देऊन तर बघा. आपण रोज सर्वांना वेळ देतो. पण स्वतःला ओळखण्यासाठी किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठी काहीच वेळ काढत नाही. म्हणजे आपण स्वतःला कधी महत्व देत नाही. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी पहाटेचा एक तास स्वतःला द्यावा. आता खूप जणांना हे जमणार नाही किंवा खूप कठीण जाईल. कारण ही वेळ आपली साखर झोपेची असते.

आणि या वेळेत उठणे आणि तेही स्वतःसाठी काहींना तर बिलकुल न पटणारे आहे. आणि त्रासाचे सुद्धा आहे. पण तुम्ही प्रयत्न केले तर अश्यक्य काहीच नाही.

” प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे “हे आपल्याला माहिती आहे. म्हणून एक तास स्वतःला देण्याचा प्रयत्न करा आणि याचे फायदे बघा….

तुम्ही रोज पहाटे उठून आपली प्रातः विधी आटपून फक्त एक तास योग प्राणायाम केल्याने आपले जीवन बदलू शकते आपले आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. आज आपण सर्वत्र पाहतो. प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या लहान मोठया आजाराने ग्रासलेला आहे. प्रत्येक मनुष्याचे जीवन धकाधकीचे झाले आहे. वाढत्या प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच मनावर देखील विपरीत परिणाम होत आहे. सर्वत्र तणावग्रस्त वातावरण आहे.आणि याचा परिणाम संपूर्ण मनुष्य जीवनावर होत आहे. प्रत्येकाला काहींना काही व्याधी उदभवलेल्या आहे. म्हणूनच अश्यामध्ये जर आपण रोज एक तास योग प्राणायाम करून या सर्व व्याधीपासून आपला बचाव करू शकतो. तसेच शुगर, बीपी, थायरॉईड, कोलेस्ट्राल, ऍसिडिटी अश्या असंख्य बिमारीतून आपण मुक्त होऊ शकतो. योग प्राणायाम आपल्याला नेहमी तंदुरुस्त ठेवते. हे नियमित केल्याने आपण शरीराने आणि मनाने मजबूत राहतो.

सर्वात महत्वाचे रोज पहाटे उठल्याने आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो.

रोज सकाळी सूर्याची कोवळी किरणे आपल्या अंगावरती पडते. त्यानी आपल्याला प्रसन्न वाटते.

आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.

आपल्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची शक्ती येते. आणि नकारात्मक विचार हळू हळू नाहीसे होतात. तसेच आपल्याला थकवा जाणवत नाही.

आपल्या दिवसाची सुरवात अगदी आंनदाने आणि सकारात्मक विचाराने होते.

आपण रोज योगिंग जॉगिंग केल्याने आपल्याला स्फूर्ती येते.

सूक्ष्म व्यायाम केल्याने आपल्या हाता पायाच्या नसा मोकळ्या होतात. आणि आपले शरीर लवचिक बनते.

सूर्यनमस्कार हा तर सर्वांगीण व्यायाम आहे. सूर्य नमस्कार केल्याने आपल्या शरीराला शक्ती व ऊर्जा मिळते. यामुळे शरीराचे सर्व अवयव लवचिक, बळकट आणि सुंदर होतात. यात सर्व आसनांचे लाभ मिळते. सर्वात महत्वाचे सूर्यनमस्कार महिलांसाठी अतिशय लाभदायक आहे. यामुळे गर्भाशय मजबूत होण्यास मदत होते. तसेच मासिक पाळीचे दोष दूर होतात.म्हणूनच सूर्यनमस्काराला सर्वागीण व्यायाम म्हटले आहे.

यासोबतच आपण भस्त्रिका प्राणायाम केल्याने वात, पित्त, कफ हे विकार बरे होतात. मन स्थिर शांत व प्रसन्न राहते.

कपालभाती प्राणायाम केल्याने हृदय व छातीतील रोग नष्ट होतात. लठ्ठपणा, मधुमेह आम्लपित्त, बद्धकोष्टता हे विकार दूर होतात. आपल्या चेहऱ्यावर तेज येते आपले मन शांत स्थिर व प्रसन्न होते.

बाह्य प्राणायाम केल्याने मधुमेह व पोटाचे विकार दूर होतात.

उज्जायी प्राणायाम केल्याने थॉयराईड, गळ्याचे विकार,टॉन्सिल, मानसिक तणाव हे आजार बरे होतात. तसेच झोपेत घोरण्याची सवय सुटते.

अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने तन मन आपले विचार पूर्णपणे शुद्ध होतात. नकारात्मक विचार सकारात्मक विचारात परावर्तित होतात. उत्साह व निर्भयता प्राप्त होते. समस्त वातरोग, सर्दी पडसे दमा अस्थमा या सारखे आजार बरे होतात.

भ्रामरी प्राणायाम केल्याने डोळे, नाक, कान, तोंड यांचे विकार दूर होतात.

उदगीर प्राणायाम केल्याने मन स्थिर होते, स्मरणशक्ती वाढते.

प्रणव – ध्यान केल्याने आपले मन एकाग्र होते.

प्राणायाम केल्याने असे अनेक आजार बरे होतात.

तसेच आसनामध्ये वज्रासन या आसनात आपण जेवण झाल्याबरोबर सुद्धा बसू शकतो. आपले जेवण जास्त झाले आणि आपल्याला जड पणा वाटायला लागला तर या आसनात दहा ते पंधरा मिनिटे बसावे लवकर आराम मिळतो.

मंडूकासन केल्याने मधुमेहासारखा आजार लवकर बरा होतो.

अर्धचंद्रासन व उष्ट्रासन केल्याने थायरॉईड, गळ्याचे विकार दम्याच्या रोग्यांना लाभ होतो.

वक्रासन केल्याने कंबरेची पोटाची चरबी कमी होते, कंबरेचे विकार बरे होतात मधुमेहासाठी अतिशय लाभदायक आसन आहे.

तसेच भूजंगासन, शलभासन, धनुरासन, मकरासन बालासन या सर्व आसनानी सुद्धा आपल्या शरीराला मजबुती येते.

पवन मुक्तासन केल्याने समस्त उदर वायू, आम्ल्पित कंबर दुःखीपासून आराम मिळतो

तसेच पोटावर वाढलेली चरबी कमी होते.

सेतू बंधासन स्कन्दरासन, पाद वृत्तासन, सर्वांगासन, हलासन मर्कटासन या आसनानी सुद्धा आपल्या शरीराला फायदा होतो.

ताडासन केल्याने आपल्या शरीरातील सर्व नसा मोकळ्या होते.

वृक्षासन केल्यास आपल्या मनाची एकाग्रता वाढते.

शवासन केल्याने संपूर्ण शरीराला व मनाला आराम मिळतो.

सिहांसन केल्याने टॉन्सिल थायरॉईड, गळ्याचे आजार बरे होतात.

हास्यासन – हसण्याने मन मोकळे होते. तणाव दूर होतो. हास्य हे तंदुरुस्तीसाठी अमृत आहे. मन आणि हृदयाला पोषक आहे. मनमोकळे पणाने हसल्याने ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ होते. हसणे हे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्य्क आहे.

असे अनेक फायदे सकाळी उठल्याने आणि योग प्राणायाम केल्याने आपल्याला होतात.

चला तर मग आपण सर्व जण रोज स्वतःसाठी वेळ काढू व योग प्राणायाम करून आपले शरीर व मन निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करू……

 

सूचना :- योग प्राणायाम किंवा कोणतेही आसन सुरु करण्यापूर्वी आपल्या मनानी न करता

योग शिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे व नंतर करावे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here