संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून 25 हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य ! 

0
492

चंद्रपूर/ विशेष-प्रतिनिधी✍🏻किरण घाटे 

 

कोरोनामुळे हतबल झालेल्या तदवतचं हातावर आणून पानावर खाणांऱ्या बांधवांच्या मदतीसाठी प्रबोधन विचार युवा मंचला संयोजक संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून 25 हजार (25,00,0) रुपयांचे आर्थिक सहकार्य मिळाले असल्याचे प्रबाेधन विचार मंच आणि युवा मंचचे विनोद साेनटक्के यांनी आज सांगितले .

 

महाभयानक कोरोना मुळे मागील वर्षभरांपासून आर्थिक कमजोर वर्गाचे सर्वच प्रकारे खच्चीकरण झाले आहे.

 

प्रबोधन विचार युवा मंचच्या पुढाकाराने गरीबांना सहकार्याच्या भावनेतुन गत वर्षी धान्य किटचे वितरण करण्यांत आले हाेते.

 

याही वर्षी लॉकडाऊन मुळे ज्यांच आजच भविष्य अंधारात आहे .अश्या बांधवाना धान्य किट वाटपाच्या माध्यमातून प्रबोधन करून मानसिक बळ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच करणार आहे.

 

याची सुरुवात संयोजक संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून 25 हजार रुपये(आर्थीक सहकार्य ) देवून करण्यांत आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here