ग्रेट वर्क!!! संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून २५ हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य

0
489

ग्रेट वर्क!!! संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून २५ हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य

चंद्रपूर/प्रतिनिधी : कोरोनामुळे हतबल झालेल्या, हातावर आणून खाणाऱ्या बांधवासाठी प्रबोधन विचार युवा मंच ला संयोजक संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून २५ हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य मिळाले.

कोरोना मुळे मागील वर्षभरापासून आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गाचे सर्वच प्रकारे खच्चीकरण होत आहे. मागील वर्षी प्रबोधन विचार युवा मंच च्या पुढाकाराने हातावर आणून खाणाऱ्या बांधवाना सहकार्य म्हणून धान्य किट च्या माध्यमातून प्रबोधन करून धान्य किट सहकार्य आणि मानसिक बळ देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.

याही वर्षी लॉकडाऊन मुळे हातावर आणून खाणाऱ्या, ज्यांच आजच भविष्य अंधारात आहे. अशा गोर गरीब बांधवाना धान्य किट वाटपाच्या माध्यमातून प्रबोधन करून मानसिक बळ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच करणार आहे.

याची सुरुवात म्हणून संयोजक संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून २५ हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य मिळाले.

या धान्य किट साहित्यात तांदूळ, गहू, अंघोळीची साबण, कपड्यांची साबण, भांड्याची साबण, पेस्ट, खाण्याचं तेल, केसांच तेल, तिखट, मीठ, हळद, बिस्किट, डाळ, साखर, पत्ती, नीरमा पाकीट ईत्यादी वस्तू देण्यात येणार आहे.

मागील वर्षी ही संकेत वेल्हेकर यांनी आर्थिक सहकार्य केले होते. या व्यतिरिक्त संकेत वेल्हेकर यांचा पॅथॉलॉजी चा व्यवसाय आहे. बऱ्याचदा आर्थिक भार सहन न करू शकणाऱ्या लोकांकडून मोफत मध्ये ब्लड टेस्ट केलेली आहे. बऱ्याचदा ‘नो लॉस नो प्रॉफिट’ वर ही वेल्हेकर काम करतात. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच च्या प्रत्येक उपक्रमाला स्वतःहून सदैव सहकार्य करीत असतात.

संकेत राजकुमार वेल्हेकर यांचे आदर्शरुपी कृतिशील कार्याला मानाचा सलाम व मनपूर्वक धन्यवाद प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूर चे विनोद आर सोनटक्के यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here