सहाव्या दिवशी 82 वर्षाच्या वृद्धेसह पाच कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण

0
230

सहाव्या दिवशी 82 वर्षाच्या वृद्धेसह पाच कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण

विविध संस्था संघटनांच्या समर्थनाचा ओघ सुरूच

चंद्रपूर/प्रतिनिधी । रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आज सहाव्या दिवशी 82 वर्षाच्या वृद्धासह 5 कार्यकर्त्यांनी शनीवारी (दि. २७) साखळी उपोषण केले.
उपोषणाचा सहावा दिवस होता. आजच्या साखळी उपोषणात श्रीमती शिलादेवी लुनावत, जयेश बैनलवार, कुणाल देवगिरकर, अब्दुल जावेद, सुधीर देव, धर्मेंद्र लुनावत यांनी सहभाग घेतला.
दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन चे समर्थन पत्र सह डॉ माडुरवार, डॉ कोलते, डॉ गुलवाडे यांनी भेट दिली. प्रियदर्शनी कन्या विद्यालय, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, शिव छत्रपती प्रचारक मंडळ नांदगाव, क्रेडाई चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग, डेबू सावली वृद्धश्रम, व्यापारीम फर्निचर असोसिएशन, अजय बहुउउद्देशीय संस्था, धनोजे कुणबी समाज मंदिर तसेच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज चंद्रपूर, माळी समाज युवा मंच, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूर, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन चे प्राध्यापक रमेशचंद्र दहीवडे, तैलिक युवा एल्गार संघटनेचे जितेंद्र इटणकर यांचा समावेश होता.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here