शेतातील जुगार अड्डयावर पोलीसाची धाड ..

0
500

नऊ जणावर गुन्हा : २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी /बाबुराव बोरोळे.मो.8788979819

लातूर :- शिरूर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची खबर मिळताच बुधवारी दि २७ मे रोजी शिरूर अनतपाळ पोलीसांनी अचानक धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम ४ हजार ३९० रूपये तसेच मोबाईल, दुचाकी असा एकंदर २ लाख ४२ हजार ८१० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोहेकाॅ हरीदास पाटील यानी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर अनतपाळ पोलीसांनी सांगितलेली माहिती अशी की शिरूर अनंतपाळ शिवारातील मन्मथ कोरे यांच्या शेतात बुधवारी नऊजण जुगार खेळत असल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून अचानक धाड टाकली असता पोलीस आल्याचा सुगावा लागताच अनेकजण जुगाराचे साहित्य, रक्कम , मोबाईल, दुचाकी आदी तिथेच टाकून पळ काढला त्यामुळे सदरील सर्व साहित्याचा पोलीसांनी पंचनामा करून रोख रक्कम ४ हजार ३९० रूपये, तसेच मोबाईल आणि दुचाकी असा एकंदर २ लाख ४२ हजार ८१० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोहेकाॅ हरीदास पाटील यानी दिलेल्या फिर्यादीवरून नऊजणा विरूद्ध गुरन १३२ / २०२१ कलम १८८ , २६९ , २७० , भादवि कलम २,३ , ४ कोव्हीड १९ च्या नियमावलीचे उल्लंघन, तसेच साथरोग कायदा १८९७ १२ (अ) मुप्रो कायद्याने कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पो.हे.काॅ पाटील करीत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here