परांडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊसाची जोरदार हजेरी …

0
494

प्रतिनिधी/उस्मानाबाद /अमोल मुसळे 

मो-9405608508

उस्मानाबाद/परांडा :- तालुक्यात देवगाव बु जेकटेवाडी, ताकमोडवाडी,उंडेगाव ,गोसायवाडी इ. परिसरात मान्सूनपूर्व पावसानी जोरदार वादळी वाऱ्यासह हजरी लावली. यामुळे अनेक झाडे लाईटचे पोल जमिनीतून उपटून निघाले आहेत. तसेच कदम वस्तीवरील शेतातील डीपी वादळी वाऱ्यामुळे उपटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मान्सूनपूर्व शेतीच्या कामांची लगबग व बी बियांचा खर्च असताना शेतातील डीपीचे नुकसान झाल्याने शेतकरी पाऊस झाल्याने सुखी तर एकीकडे नुकसान झाल्याने दुःखी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here