वणी पोस्ट ऑफिस येथे कर्मचाऱ्याची आत्महत्या…

0
577

वणी पोस्ट ऑफिस येथे कर्मचाऱ्याची आत्महत्या…

वणी/प्रतिनिधी : ओमकार काशीनाथ पाचभाई वय 45, रा विठ्ठल वाडी, वणी. मृतक कनिष्ठ सहाय्यक पोस्ट मास्तर, शिंदोला येथे कार्यरत होते. रोज वणी येथे घरी 1 वाजता येत होते. शिंदोल येथून 11 ला रोज वणीच्या पोस्ट ऑफिस मध्ये येऊन व्यावहारिक रोख रक्कम जमा करायचे. पुन्हा काही काम असले तर परत यायचं मात्र आज ते घरी गेलेच नाही त्यामुळे शोध सुरू झाला. त्यांची दुचाकी एमएच 34 बीएक्स 3116 ही गाडी पोस्ट ऑफिस च्या मागे उभी होती. ऑफिस मधून फोन आला त्यांच्या पत्नीला गाडी आहे व ते दिसत नाही. त्यामुळे सर्वांनी शोध घेतल्यानंतर वर कार्यलयाची एक कागदपत्रची खोली आहे. ती आतून बंद होती व तेथील कर्मचारी यांना खालून त्यांचा मृत देह अटकलेला दिसला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. अतिशय दुखद व धक्कादायक घटना वणी शहरात घडल्याने वाऱ्यासारखी बातमी शहरात पसरली. आत्महत्येचे कारण कोणालाच माहीत नाही. त्यांच्या मागे दोन मुलं, पत्नी, आई व भाऊ असा परिवार असून सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयातील कर्मचारी व परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here