ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकाराला समाज मुकला – आ. जोरगेवार
🟢💠🟡चंद्रपूर💠🟡किरण घाटे💠🟡☀️
आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार रामदासजी रायपूरे यांच्या निधनाची बातमी मन हळवे करणारी असून पत्रकारिता क्षेत्रात चार दशकाहून अधिक काम करत पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील सर्वच विषयाला स्पर्श करणारे रामदासजी रायपूरे यांच्या जाण्याने समाज ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकाराला मुकला असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
दिवंगत ज्येष्ठ पत्रकार रामदास रायपूरे यांच्या प्रदिर्घ अशा पत्रकारीतेच्या प्रवासात त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषयाला स्पर्श करत न्याय देण्याचा प्रयत्न केला. 🟩💠🟡🟢आंबेडकर चळवळीतील त्यांचे योगदान समाज कधीही विसणार नाही. लेखनीच्या ताकतीवर अनेक विषयही त्यांनी मार्गी लावले. शासन आणि प्रशासनाच्या कारभारावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. 🟢🟣🟡💠पत्रकारीतेत येवू पाहत असलेल्यांसाठी ते मार्गदर्शक होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदही त्यांनी उत्तम रित्या भुषविले. त्यांच्या जाण्याने पत्रकारीतेसह सामाजीक क्षेत्राचीही फार माेठी हानी झाली आहे. रायपुरे परिवाराशी माझे कौटुंबिक संबंध होते त्यामुळे त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तीकही नुकसान झाले आहे. जेव्हा जेव्हा चंद्रपूरच्या पत्रकारीतेचा विषय निघेल तेव्हा तेव्हा रामदासजी रायपुरे यांचे नाव आदराने घेतले जाईल. अशी भावना देखिल शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी या वेळी व्यक्त केली.