खोब्रागडे

0
463

वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी गोवा विदेशी दारु व मोह दारू वर चिमूर पोलिसांची धाड

 

चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात आज 27 एप्रिल ला पेट्रोलींग करत असताना मुखबीराकडुन खाञीशीर माहिती मिळाली असता सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर दोन्ही रा. कवडशी हे मानुसमारी जंगल परिसरात हातभट्टी मोहादारु काढत आहे. अशी गुप्त माहीती पोलीसांना मिळाली त्या वरुन मानुसमारी जंगल परिसरात पोलीस लपत छपत मोहादारु भट्टी कडे गेले असता दोन्ही आरोपी हे पोलीसांची चाहुल लागताच जंगलाचे दिशेने पळुण गेले. तिथे एकूण 2,50,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तसेच सोनेगाव शिवार उमा नदीचे काठावर दारूबंदी धाड टाकली असता एकुण 224000 रु मुद्देमाल मिळुन आला. यातील आरोपी सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर सर्व रा. कवडशी हे आहेत. आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून मोह सडवा, हातभट्टी मोहा दारू असा एकूण 4,74,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपी विरुद्ध रितसर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हेची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नेरी येथील श्रीमती जिंदरकौर अकालसिंग भौंड, वय ४० वर्ष हिचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता ८० लिटर हातभट्टी मोहादारु किं. ९६,०००/-रु. चा माल मीळून आला.नेरी येथील प्रवीण संभाजी नगराळे, वय ३५ वर्ष ह्यचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता ३०नग प्रत्येकी १८०मिली.गोवा विदेशी दारु. किं. ६,०००रु. तसेच २५ लिटर हातभट्टी मोहादारु किं. ३०,०००/-रु. असा एकुण ३६,०००रु. चा माल मीळून आला.काजळसर येथील सीद्धार्थ पतीराम निकोडे, वय ३८वर्ष ह्यचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता ४०नग प्रत्येकी १८०मिली. गोवा विदेशी दारु. किं. ८,०००रु. तसेच ४० लिटर हातभट्टी मोहादारु किं. ४८,०००/-रु. असा एकुण ५६,०००रु. चा माल मीळून आला.मोटेगाव येथील राष्ट्रपाल गोपीचंद गेडाम, वय ३२वर्ष ह्यचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता ३८नग प्रत्येकी १८०मिली. गोवा विदेशी दारु. किं. ७,६००रु. तसेच १० लिटर हातभट्टी मोहादारु किं. १२,०००/-रु. असा एकुण १९,६००रु. चा माल मीळून आला. तसेच नेरी येथील नरेश श्रीहरी ढाले, वय ३८वर्ष ह्यचे घरी दारूबंदी कर्यवाही केली असता १०नग प्रत्येकी १८०मिली.देशी दारु. किं. २,०००रु. चा माल मिळून आला. एकंदरीत नमूद आरोपी कडून एकूण किं. २,०९,६००रु. चा विदेशी, देशी दारु, तसेच हातभट्टी मोहादारुचा माल मीळून आला.उपरोक्त आरोपी यांचेविरुद्ध रितसर गुन्हा नोंदविण्यात येत असून सदरची कार्यवाही पुढील कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. साळवे सा.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बगाटे सा.पो.नि श्री रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात Api मंगेश मोहाळ NPC कैलास आलाम, अंमलदार HC विलास निमगडे, PC सचिन गजभिये, सचिन खामनकर, शैलेश मडावी,तसेच चालक HC शंकर उरकुडे, प्रमोद गुट्टे, प्रविण गोन्नाडे, स्टेशन चिमूर अंतर्गत पोलीस चौकी नेरी येथील पो.उप.नि. राजु गायकवाड, NPC/20, दिनेश सूर्यवंशी, PC/2565, सचिन साठे, PC/2765, विशाल वाढई यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here