जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारकांना जमीनीचे पट्टे द्या! सुदाम राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
323

जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारकांना जमीनीचे पट्टे द्या!
सुदाम राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिवती/चंद्रपूर : विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून जिवती तालुक्याची शासन दरबारी ओळख जरी असली तरी वर्षांनुवर्षे या तालुक्यात अतिक्रमणांची शेती करुन आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह निर्वाह करणारा शेतकरी मात्र शेतीच्या पट्ट्यांपासून आज ही वंचित आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शासनाकडुन या जमिनीचा कायमस्वरूपी पट्टा आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर या तालुक्यातील शेतकरी जिवन कंठीत आहे. या बाबतीत आज रविवार दि. १२ फेब्रुवारीला बंजारा काशी पोहरादेवी येथे सुदाम राठोड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लेखी निवेदन देऊन जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारकांची व्यथा मांडली व त्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे त्वरित द्या अशी मागणी केली.

दरम्यान जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारक सन 1950 ते 1955 पासून जंगल तोड करून आपल्या शेतीची मशागत करीत आहे. त्याच आधारावर त्यांच्या परिवारांचा उदारनिर्वाह चालत असतो.

स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन देखील येथील शेतकऱ्यांना आतापर्यंत हक्काचे (जमीनपट्टे) मिळालेच नाही. ही एक शोकांतिका आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणारे मुख्यमंत्री असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुदाम राठोड यांनी केली आहे. बंजारा काशी धाम पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करताना सगुणाबाई जाधव, संभाजी वारे, प्रेमदास राठोड, अमोल चव्हाण, संदीप जाधव, व्यंकटी पवार, ज्ञानेश्वर राठोड, गोविंद पवार आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here