टेबूंरवाही येथे कोविड प्रतिबंधक लस केन्द्रांची मागणी

0
571

टेबूंरवाही येथे कोविड प्रतिबंधक लस केन्द्रांची मागणी

राजुरा/प्रतिनिधी : तालुक्यातील ग्रामपंचायत टेबूंरवाही येथे कोविड प्रतिबंधक लस केंद्र देण्यात यावे. राजुरा उपजिल्हा रुग्णालया मार्फत देवाडा पि. ऐ. सी. देण्यात आली आहे. देवाडा पि. ऐ. सी ला अनेक ग्रामीण भागातील गाव जोडले गेले आहे. केन्द्र शासनाच्या निर्देशित परीपत्रका नुसार १८ वर्षावरील नागरीकांना कोविड लस देण्याचे आदेश देण्यात आले असून देवाडा किंवा राजुरा येथे नागरीकांची लसीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नागरींकाची मोठी गर्दी होऊ नये व नागरीकांना सुरळीतपणे लस उपलब्ध व्हावी. यासाठी देवाडा पि. ऐ. सी. अंतर्गत येणाऱ्या टेबूंरवाही उपकेंद्रामध्ये अनेक गावे जोडल्या गेली आहे. वयोवृद्ध लोकांना देवाडा किंवा राजुरा येथे लस घेण्यासाठी जाणे खुप त्रासदायक ठरत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून कोविड लस केंद्र टेबूंरवाही ग्रामपंचायत येथे देण्यात यावी, अशी मागणी टेंबुरवाही ग्रामपंचायत चे रहिवासी तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा चे तालुका सचिव व सामाजिक कार्यकर्ते दिपक मडावी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here