छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य वतीने समीर बागसिराज यांना “छावा” पुरस्कार प्रदान

0
518

छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य वतीने समीर बागसिराज यांना “छावा” पुरस्कार प्रदान

वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुरडीचे वाचविले प्राण

 

पुण्यामधील वारजे पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात पुराणिक या जखमी कुटुंबातील मुलीला वाचविण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अँम्बुलन्सला वेळ लागत आहे, हे लक्षात येताच त्यांनी मुलीला उचलून रस्ता मिळेल त्या दिशेने धावत सुटले. एका रिक्षाचालकाच्या साथीने जवळचे हॉस्पिटल गाठले व त्या मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्या चिमुरडीचे प्राण वाचले.

समीर बागसिराज यांची ही धावपळ इतरांना देखील उत्साह व संकटसमयी धावून जाण्याची प्रेरणा देणारी आहे. “छावा” पुरस्कार हा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील) यांच्या हस्ते देण्यात आला.

सदर “छावा” पुरस्कार देतेवेळी छत्रपती शिवाजीनगर युवक अध्यक्ष हेमंत शिगवण, मोहसीन शेख, मनोज भालवणकर, उमेश चांदणे व मित्र परिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here