भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या महामंत्री पदी रोशन बन्सोड यांनी नियुक्ती

0
714

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या महामंत्री पदी रोशन बन्सोड यांनी नियुक्ती

आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील खडसंगी येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा चे कार्यकर्ते रोशन मधुकर बन्सोड यांनी मागील पाच वर्षातील पक्ष संघटनेसाठी केलेली बांधणी व पक्षाच्या विचाराचा व विकासकामांचा प्रसार लक्षात घेऊन आज त्यांना भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा महामंत्री पदी पक्षश्रेष्ठींनी निवड केली. कामगार व महाराष्ट्र दिनाच औचित्य साधत आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते त्यांना चिमूर येथील निवासस्थानी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलं. सोबतच त्याचं अभिनंदन करण्यात आलं.

 

या वेळी भारतीय जनता पक्षाचे चिमूर तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव मनीष तूंमपलीवार,भाजप जेष्ठ नेते नीलम राचलवार,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर,योगेश नाकडे आदी उपस्थित होते.त्यांच्या या निवडीने पक्ष संघटना अधिक मजबूत होणार असा विश्वास या वेळी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी व्यक्त केला.सोबतच रोशन बन्सोड यांनी या नियुक्तीने जबाबदारी अधिक वाढली असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचं व युवा वर्ग भाजपमध्ये जोडण्याचा मानस व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here