पत्रकार दिनाचा कार्यक्रम मनपा कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आला

0
218

पत्रकार दिनाचा कार्यक्रम मनपा कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आला

महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत

प्रतिनिधी /देवेंद्र भोंडे
अमरावती

महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 6 जानेवारी,2021 रोजी दुपारी 2.00 वाजता पत्रकार दिनाचा कार्यक्रम मनपा कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आला होता. पत्रकार दिनानिमित्‍य मा.आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी सर्व पत्रकार बंधुंना यावेळी गुलाबाचे फुल, पेन व डायरी देवून त्‍यांना पत्रकार दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. आयुक्‍तांनी पत्रकारांच्‍या कार्याची प्रशंसा केली. कोरोनाच्‍या या काळात पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सहकार्य केले. अनेक अनुषंगीक बाबी पत्रकारांनीच प्रशासनाला अवगत करुन दिल्‍या. महानगरपालिकेला पत्रकारांनी नेहमी सहकार्य केले आहे. पत्रकार हे एक प्रकारे कोरोना योध्‍दे म्हणूनच कार्यरत आहे.

या कार्यक्रमात उपआयुक्‍त सुरेश पाटील, अमित डेंगरे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, पत्रकार बंधु व भगिनी उपस्थित होते…

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here