खवातीन ए इस्लाम कडून विविध कार्यक्रम संपन्न, मान्यवरांच्या सत्कारा चे आयोजन

0
467

खवातीन ए इस्लाम कडून विविध कार्यक्रम संपन्न, मान्यवरांच्या सत्कारा चे आयोजन

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
चंद्रपूर येथील खवातिन ए इस्लाम या सामाजिक संस्थे च्या कामाने समाजात जागरूकता वाढत असून ही संस्था दिवसेंदिवस नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करून नाव लौकिक मिळवत आहे. नुकतेच मुस्लिम समाजाच्या प्रथम शिक्षिका फातिमा शेख याची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजाने शिक्षण शेत्रात पुढे येऊन आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शाहीन शेख यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले.
यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. नुकतेच समाजातच नव्हे तर सर्व धर्मात शांतता नांदावी सर्वजण सुख शांती निरोगी रहावे कोरोनातून मुक्ती मिळावी या साठी हजरत खाजा खलीलुल्ल्ह शाह कलंदर चिशती याचे वार्षिक उर्स निमित्त खवातीन ए इस्लाम संस्थेचे सर्व पदाधिकारी फुलं चादर चढवून सर्वा साठी प्रार्थना करण्यात आली. १७ तारखेला समजातील काही मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केले असून विविध क्षेत्रात नाव कमवणाऱ्या व्यक्तीत घुगूस येथील इबादूल सिद्दीकी समाज हितैसी, आदर्श शिक्षक राजुराचे मुसा शेख, बाबुमीया शेख, गडचांदुर येथील पत्रकार मो. रफिक शेख याचा समावेश आहे. नफीसा शेख, मलायका शेख, हूमेरा खान व त्याचे सहकारी कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्नशिल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here