कोठारी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भाजपा प्रणित ग्रामविकास आघाडी ला घवघवीत यश

140

कोठारी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भाजपा प्रणित ग्रामविकास आघाडी ला घवघवीत यश

कोठारी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भाजपा प्रणित ग्रामविकास आघाडी ने कोठारी ग्रामवासियांचे मत रूपी आशीर्वाद प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले.
वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे दि. २४/१२/२०२२ ला कोठारी ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी व श्री किशोर मोहुर्ले सह प्रभारी म्हणून ची जिम्मेदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सत्कार केला. सोबतच ग्रामविकास आघाडी मधुन निवडून आलेले नवनियुक्त सरपंच आणि सदस्य यांचा देखील सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते वनविकास महामंडळ माजी अध्यक्ष श्री चंदन सिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री देवरावदादा भोंगळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष श्री हरीश शर्मा, जिल्हा संघटक मंत्री श्री राम लखिया व अन्य मान्यवर उपस्थित होते.

advt