सहजं सुचलं कलाकुंजच्या संयाेजिका पदी उज्वला यमावार तर सहसंयाेजिका पदी कु.पायल आमटेची निवड

0
523

सहजं सुचलं कलाकुंजच्या संयाेजिका पदी उज्वला यमावार तर सहसंयाेजिका पदी कु.पायल आमटेची निवड

चंद्रपूर : महाराष्ट्रातील स्रियांच्या व नवाेदितांच्या कला गुणांना वाव देणा-या सहजं सुचलंच्या कलाकुंज महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका पदी मुंबई (आय बी डब्लू ए) इंडियन ब्युटीक्यून वेलफेअर असाेशिएशनच्या गडचिराेली निवासी उज्वला यमावार तर सहसंयाेजिका पदी चंद्रपूरच्या कु.पायल आमटे यांची निवड करण्यांत आली .या शिवाय या कलाकुंज व्यासपीठासाठी प्रसिध्द प्रमुखा म्हणुन अनुक्रमे दुर्गापूरच्या कु .कविता चाफले व चिमूर नेरीच्या ज्याेति मेहरकुरे यांची नियुक्ती करण्यांत आली आहे.महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका वैदर्भिय सुपरिचित जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे तसेच प्रभा अगडे यांनी या व्यासपीठाच्या नियुक्त्या काल केल्या .गत चार वर्षापुर्वि सहजं सुचलं व्यासपीठ सुरु करण्यांत आले असुन या व्यासपीठाचे एकुण चार ग्रुप आहे .ग्रुप वरील महिला सभासद संख्या आजच्या घडीला सहाशेच्या घरात आहे दरम्यान नवाेदितांच्या या (नवनियुक्त) निवडीचे स्वागत सहजं सुचलंच्या सुविधा बांबाेडे , सराेज हिवरे , अल्का सदावर्ते , मंथना नन्नावरे , प्रतिभा चट्टे , साधना वाघमारे , पायल टाेपकर , पुनम रामटेके रसिका ढाेणे , श्रुति कांबळे या व्यतिरीक्त स्मिता बांडगे , विजया भांगे , गीता बाेरडकर , श्रुति उरणकर , प्रतिक्षा झाडे , श्रध्दा हिवरे , नयना झाडे , मनीषा रिठे , मंजुषा दरवरे ,भारती मैदपवार , विजया तत्वादी , प्रतिभा नंदेश्वर , सुविधा चांदेकर , संजिवनी धांडे सुवर्णा लाेखंडे , छबुताई वैरागडे , शितल काेसरे निर्मला लाेहितकर , शिवानी नन्नावरे व अर्जुमन शेख यांनी केले असुन त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here