मारहण केल्याचा आरोप खोटा

0
1022

मारहण केल्याचा आरोप खोटा

● बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव

● पत्रकार परिषदेत दिपक सातपुतेंचा खुलासा

गोंडपिपरी (सूरज माडूरवार)

गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) गावात विजय येवले नावाच्या गावक-याला पंचायत समिती सदस्य दिपक सातपूते यांनी मारहाण केली.पोलीसात तक्रार देउन पोलीसांकडूनही मार खायला लावला. दि.२१ मंगळवारला येवलेंनी पत्रपरिषद घेत दिपक सातपुते यांच्यावर आरोप केले होते.बुधवारी दि.२२ पत्रकार परिषद घेत आरोपाचे सातपुतेंनी खंडन केले आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी सोनापूर (देशपांडे ) येथे गावातील महिलांनी सरपंच जया दीपक सातपुते यांच्या मदतीने गावात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला. नुकतेच लाठी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार यांनी सुद्धा अवैध दारूविक्री बंदी करिता दुजोरा दिला व अवैध दारू विक्रेत्यांना अवैध दारू विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करू असा दम देखील दिला. त्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्था होती .अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. त्याच अनुषंगाने विजय येवले यांनी आठ ते दहा दिवसांपासून अवैद्य दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतलेल्या महिलांना अश्लील शब्दात शिवीगाळ करीत होता त्यानंतर 12 तारखेला घरी येऊन गावात अवैध दारू विक्री करू द्या असे म्हणत आडकाठी केल्यास तुमची गाडी जाळू तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देखील दिली. परंतु घरी गणपतीची पूजा सुरू असल्यामुळे त्याला कसलेही उत्तर न देता तू शांत घरी जा म्हणून मी त्याला सल्ला दिला. उपस्थित लोकांनी देखील त्याला समजून त्याच्या घरी मद्यधुंद अवस्थेत त्याला पोहोचवण्यात आले .त्यामुळे मारहाण केलेला आरोप अत्यंत चुकीचे असून यात काही तथ्य नाही हा पूर्णपणे बेजबाबदार व्यक्ती असून नेहमी मद्यधुंद अवस्थेत असतो. गावात व परिसरात अनेकांशी त्याचे वाद विवाद व मारहान नेहमी होत असते. त्याच्या शरीरावर जखमा आहेत त्या इतर ठिकाणी कुठेतरी मारहाण झाल्यामुळे असावं कारण तो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे .माझी राजकारणातली वाढती लोकप्रियता बघून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धडकी भरली आहे .राजकारणात आपली डाळ शिजत नाही हे बघून राजकीय षडयंत्र आखत आकसापोटी विजय येवले सारखे मद्यधुंद आणि बेजबाबदार व्यक्तीचा वापर करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे असा खुलासा पत्रकार परिषदेतून आरोपांचे खंडन करत दीपक सातपुते यांनी केला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष चेतन गौर,भाजपा नेते निलेश सांगमवार,ग्राम पंचायत सदस्य विनोद पाल उपस्थित होते.

 

दिपक सातपूते हे भाजपचे नेते असून सोनापूर गावात त्यांच्या कार्याची पावती म्हणून गावकऱ्यांनी सातत्याने सातपुते कुटुंबियांवर विश्वास ठेऊन गेल्या पंधरा वर्षापासून गावाचे नेतृत्व त्यांच्या हातात दिले आहे.सद्या स्थितीत दीपक सातपुते पंचायत समिती सदस्य तर त्यांच्या पत्नी गावच्या सरपंच आहेत.पंचायत समिती निवडणूकीत अनेक मात्तबरांशी दोन हात करून सभापतीपद मिळविले होते.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय येवले यांना सोबत घेऊन खोटे आरोप करत भाजप व दीपक सातपुते यांची बदनामी करण्याकरिता घडवून आणलेला षड्यंत्र आहे. – विनोद पाल ,सदस्य ग्रामपंचायत सोनापूर देशपांडे

 

सोनापूर गावाची सर्वांगीण दृष्ट्या होणारी प्रगती ही विरोधकांना नकोशी आहे. यासाठी मला बदनाम करण्याचे प्रयत्न चालविले जात आहेत. याचे सुत्र राजूरा येथून हलविले जात असल्याची टिका यावेळी दिपक सातपूते यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here