चिमूर क्रांतीभुमीत अन्याय अत्याचार खपवून घेणार नाही – रुपेश निमसरकार

0
485

चिमूर क्रांतीभुमीत अन्याय अत्याचार खपवून घेणार नाही – रुपेश निमसरकार

◆ ऑल इंडिया पँथर सेनेची संघठन कार्यकारिणी गठीत

चंद्रपूर : ऑल इंडिया पँथर सेना जिल्ह्यात संघठन वाढीसाठी कंबर कसली असून चिमूर क्रांतीभुमीत तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी संघठन बैठक भिसी येथे पार पडली. त्यादरम्यान चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार बोलताना म्हणाले की, या क्रांतीभुमीत कुठलाही अन्याय अत्याचार खपवून घेतला जाणार नाही.पँथर सेना त्याचा ताकदीने मुकाबला करुन बंड करेल. चिमूर तालुक्यातील भिसी स्थानिक मैत्रेय बुद्ध विहारात रविवारला ऑल इंडिया पॅन्थर सेनेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रुपेश निमसरकार होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, चंद्रपूर जिल्हा सल्लागार संतोष डांगे, सुमित कांबळे, अतुल भडके उपस्थित होते.

प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दलित, आदिवासी, मागासवर्गीय महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः अनुसूचित जाती व बौध्दांवरील अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी, ‘जशास तसे’ पद्धतीने उत्तर देण्यासाठी समाजाला संघटित राहून लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संघटनेची अत्यंत आवश्यकता आहे. हे काम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार ऑल इंडिया पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून उत्तम रीतीने करीत आहेत. त्यामुळे या संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन गावोगावी ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचा विस्तार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

बैठकीत भिसी येथील सिद्धार्थ चहांदे, वामन गेडाम, गोविंदा निकोसे, मोरेश्वर गोंगले नाजूक मेश्राम, विलास मेश्राम, आंबोली येथील मनोज सरदार, भशारकर, आंबेनेरी येथील डांगे, गडपिपरी येथील शहारुस्तम बन्सोड, नवेगाव येथील आशिष गेडाम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here