चंद्रपूरात केंद्र सरकारच्या कडधान्य आयातीच्या विरोधात प्रहारचे ताळी थाळी बजाव आंदोलन 

0
549

चंद्रपूरात केंद्र सरकारच्या कडधान्य आयातीच्या विरोधात प्रहारचे ताळी थाळी बजाव आंदोलन 
चंद्रपूर, किरण घाटे : केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणाच्या निषेधार्थ काल गुरुवार दि. २०मे ला महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडु यांच्या आदेशाने जटपुरा गेट चंद्रपुर, येथे टाळी थाळी आंदोलन करण्यात आले..या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे महेश हजारे , प्रफुल चवरे, स्वप्नीलभाऊ भुजाडे,सोनु चवरे, शुभम ऊदापुरे, आकाश मोहीतकर, अशोक हजारे, अण्णासाहेब हजारे हे सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने तात्काळ कडधान्यांची गरज नसताना केली जाणारी आयात थांबवावी, तरच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल.कड धान्यांची आयात केली तर बाजार भाव पडेल व कवडी मोल किंमतीत आपला शेतीतील माल शेतकऱ्यांना विकावा लागेल यात प्रचंड आर्थीक नुकसान शेतकऱ्यांचे होईल अशी भिती प्रहारचे महेशभाऊ हजारे यांनी या आंदोलनाच्या वेळी बाेलतांना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here