काळी बुरशी आजाराला साथरोग म्हणून घोषित करा-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
501

काळी बुरशी आजाराला साथरोग म्हणून घोषित करा-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

हिंगणघाट, अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काळी बुरशी आजाराला साथरोग म्हणून घोषित करा. अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना महामारी समोर आलेल्या काळी बुरशी (ब्लॅक फंगस) आजार हा सरकार व जनतेसाठी चिंतेची बाब बनली आहे.
कोरोनाचा वाढत असलेला प्रचंड आजार काळ्या बुरशीच्या आजारासाठी त्रासदायक होत असताना पांढऱ्या बुरशीचे संकट निर्माण झाले आहे.’काळ्या बुरशी’ पेक्षा अधिक घातक असलेल्या ‘पांढऱ्या फंगस’ च्या आजाराचे चार रुग्ण बिहारच्या राजधानी पटना मध्ये आढळून आले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पांढरे फंगस हे फुफ्फुसात होणाऱ्या संसर्गाचे मुख्य कारण असून या आजारामुळे फुफ्फुसा शिवाय शरीरातील इतर अवयवांना निकामी करतो.
कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शिंका व खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबातून कोरोनाचे विषाणू जवळपास हवेतून 10 मीटरपर्यंत पसरू शकतात असा इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे कोरोनाची महामारी थांबविण्यासाठी कोरोना संबंधीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंदिस्त जागेऐवजी हवेशीर मोकळी जागा अधिक फायदेशीर असल्याचे सरकारने सांगितले आहे कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी मास्क,शारीरिक अंतर, सॅनिटाइजेशन ,नियमित स्वच्छता,हवेशीर जागा हे प्रभावी शस्त्र असल्याचे सांगण्यात आले आहे.
तरी महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काळी बुरशी आजाराला साथरोग म्हणून घोषित करावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here