वीज ग्राहकांना लाईट बिल चा झटका तर लाईनमेन ची विद्युत कापण्याचा भितीने होतेय दारूची सोय…

0
823

वीज ग्राहकांना लाईट बिल चा झटका तर लाईनमेन ची विद्युत कापण्याचा भितीने होतेय दारूची सोय…

वायरल फोटोने झाले पितळ उघडे…

गडचिरोली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या. विभागीय कार्यालय आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या विद्युत विज केंद्र येनापुर येथे लाईनमेन या पदावर कार्यरत असणारे कवडुराम घोडमारे गोरगरीब सामान्य जनतेला वीज बिला संदर्भात अर्वाच्य भाषेत बोलतात. सामान्य लोकांना घाबरवत धाक दाखवून स्वतःसाठी दारूची व्यवस्था करतात ते वायरल फोटो वरून स्पष्ट होत आहे. एवढेच काय तर चक्क वर्दीवर, कर्तव्यावर असताना दारू पित असल्याचा आरोप स्थानिक जनतेतून करण्यात येत असून कार्यालयीन वेळेत कामकाज सोडून दारू ढोसकत मित्र मंडळीत असलेला फोटो वायरल झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांना लाईनमन यांच्याकडे दारू येतेच कशी? येत असेल तर कोणत्या मार्गाने येत असेल?यावरूनच लक्षात येत आहे. वायरल फोटोमुळे पालिस विभाग काय कारवाई करतील याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे .

वीज वितरण कंपनी मध्ये मिळालेल्या माहितीनुसार घोडमारे हे येनापुर येथे लाईनमेन म्हणून कार्यरत आहे . येथील स्थानिक भोळ्या भाबड्या जनतेला वीज बिला संदर्भात धमकावण्याची स्टाईल ही गावरान लोकासारखीच असून सायंकाळ आणि कर्तव्यावर गरिबांना आपल्या काचेच्या ग्लास मध्ये मद्याची सोय करून वर्दीवर असताना नशा करतात. जनतेला वेठीस धरण्याचा हा निंदनीय प्रकार उजेडात येत आहे.
सध्या लॉकडाउन मुळे सामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउन च्या शिथिलतेमुळे सामान्य लोक आपली भाकरी मिळवून पोट भरण्याची सोय करत आहेत. अशातच वीज वितरण कार्यालयातील दारूच्या आहारी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर गैरवर्तणुक करणाऱ्या लाईनमेन वर योग्य कारवाई करून वेळीच आवर घालण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here