जिवनाचं खरं वास्तवं! 🟥नागपूर☯️किरण घाटे🟨🟪☯️महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्य व्यासपीठाच्या एक जेष्ठ कवयित्रि तथा नागपूरच्या सुपरिचित लेखिका अनुपमा मुंजे यांनी सत्य परिस्थितीवर जिवनाचं खरं वास्तवं हा संक्षिप्त लेख शब्दांकित केला आहे . ताे खास आम्ही वाचकांसाठी देत आहाे.🟪☯️🟥🟩🌼☯️🟧🟪☯️🟨डम,डम ,डम,कडकडून डफलीवर थाप आली।दुपारची शांत वेळ।तसा उन्हाळा सुरू झालेला।गरम उन्हाच्या झळा जाणवायला लागल्यात।लोकं आपल्या घरात एसी,कुलरच्या थंडाव्यात दडून बसलेले।दारं खिडक्या बंद।तश्या मनाच्याही खिडक्या, दारं शहरात बंद झालेली आहेत।सिमेंट काँक्रीट च्या जंगलात मनाच वेडं पाखरू हरवून गेलं आहे।
तर तापल्या उन्हात ,ही थाप आली आणि मनाला हलवून गेली।सोबत बासरीची हळुवार लय।मी खिडकी उघडून बाहेर डोकावले।भर उन्हात डोंबाऱ्याची दोन नऊ ,दहा वर्षांची मुलं आणि त्यांची आई होते।आई डफली वाजवत होती।आणि लेक दोन झाडाला दोरी बांधून त्यावर आपला तोल सावरत नाचत होती।आणि लहानगा बासरी वाजवत होता।क्षणभर काळजाचा ठोका चुकला।डफलीची लय वाढत होती,
झोकेही वाढत होते।उन्हात घामाच्या धारांसोबत बासरीची धून उन्हालाही खेळवत होती।
काळ जणू थांबला होता।माझे प्राण डोळ्यात आले होते।नकळत वातावरण भारले गेले।काही घराच्या आणि मनाच्या खिडक्या उघडल्या।मग अचानक डफली थांबली।बासरी वाल्या मुलाने काजळाने मिशा रंगवल्या होत्या तो एकेक करामती करून दाखवत होता।लेक पदर पसरून पैसे मागत होती।नकळत कुणी सटकत होते।ऊन वाढत होते।तिच्या झोळीत काही आणेच होते।तिने वर बघितले ,पाणी मागितले।मी त्यांना वर बोलावले।त्याच वयाची माझी लेक डोळे विस्फारून हे बघत होती।दोन्ही लेकीत परिस्थिती ची प्रचंड दरी।दोन टपोऱ्या डोळ्यात माझं घर बघून विस्मय होता।कुठेतरी मनाचा एक कोपरा हलला,मी तिला खाऊ व,पैसे दिले।माझ्या लेकीने नकळत तिचे 2 चॉकलेट तिला दिले।दोन डोळे प्रसन्न हसले।मुलं जायला निघाली।लेकमात्र अडखळत म्हणाली ,”मॅडम जी मेरी अम्मा के लिए कुछ दीजिये ना।अरे हो मी विसरले होते त्या उन्हातल्या बाई ला।रोटी दो अम्मा”निरागसपणे ती बोलली अम्मा ने सूबे से कुछ नही खाया”मनात कुठेतरी हललं,मी काही पोळया,भाजी ,वरण भात त्या मुलीसोबत दिले।पाणी घेऊन मी खाली उतरले।लेकिने आईला पैसे व जेवण दिले।सावलीत ते तिघे जेवायला बसले।
जेवून तृप्त झाले।पाणी प्याले खुप दिवसांनी पूर्ण जेवल्याचा आनंद लेकरांच्या मुखावर दिसत होता।मी चौकशी केली मुलांचा बाप कुठंतरी परां गदा झाला होता।ही मुलांना घेऊन पोट भरायची।बाई नकळत रडायला लागली।
अम्मा रो मत।मैं बड़ी होकर नोकरी करूंगी।आपकी मद्त करूंगी।लेक आश्वासक शब्दात उत्तरली।त्या मख़्मली शब्दात धीर आणि ताकद होती।मला लेक म्हणाली”बाईजी,मैं काम करूंगी,खूब पढूंगी,अम्मा की मद्त करूंगी।सचमुच।
खरच त्या इवल्याशा डोळ्यात आशेची मोठी स्वप्न आणि दिलासा होता।
लहान डोळे नकळत जाणते झाले होते।
माझ्या मनाच्या खिड़क्या
उघडल्या।आणि माझेही डोळे नकळत पाणावले।
🟪🟥🟨अनुपमा मुंजे, नागपूर
