▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
█▓ जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर █▓
█▓ भारताचे पंतप्रधान असते तर… █▓
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
लेखांक – १
—–◆●◆—–
लेखक
✍ सचिन विलास किरत
———————————————–
गांधीजींनी स्वराज्य मिळवले परंतु या स्वराज्याचे सोने केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या स्वराज्याचे सुराज्य केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या परीस स्पर्शाने.
(हा जर तर चा कल्पना विलास नव्हे तर हे आहे राज्यशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, मानसशास्त्रीय, परदेशी धोरण शास्त्रीय, तर्कशुद्ध सडेतोड विश्लेषण)
आंबेडकरवाद विचारात घेतला असता तर भारतात आणीबाणी आलीच नसती. डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक विचार लक्षात घेतले असते तर भारत आर्थिकदृष्ट्या सुपर पॉवर झाला असता.
लोक जॉन केन्सला विसाव्या शतकातील श्रेष्ठ अर्थ तज्ञ मानतात. परंतु डॉ. बाबासाहेब हे जगातील सर्वश्रेष्ठ कल्याणकारी अर्थतज्ञ आहेत. आंबेडकरवाद हा जगातील सर्वश्रेष्ठ वाद आहे. आंबेडकरवाद हा मार्क्सवादापेक्षा श्रेष्ठ आहे. जिथे गांधीवाद संपतो तिथे आंबेडकरवाद सुरु होतो.
संपूर्ण भारताने “जयभिम” बोलावे चक दे इंडिया या चित्रपटात शाहरुख खान म्हणतो, “नाही मुझे स्टेट के नाम दिखाई देते है, नाही मुझे स्टेट के नाम सुनाई देते है, मुझे सिर्फ एक ही नाम दिखाई देता है वो हे इंडिया एक मुल्क।” या विचारांना भारताने डोक्यावर घेतले पण हे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६० वर्षापूर्वी प्रथम मांडले.