जबाबदार कोण…?एरंडोल येथे हॉटेल व्यवसायिक सर्रास वापरत आहेत घरगुती गॅस सिलेंडर.

0
428

जबाबदार कोण…? एरंडोल येथे हॉटेल व्यवसायिक सर्रास वापरत आहेत घरगुती गॅस सिलेंडर.

 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी

 

एरंडोल शहरातील बहुतांश हॉटेल व्यवसायिक सर्रास घरगुती गॅस सिलेंडर वापरत आहेत.काही हॉटेल तर चक्क पुरवठा विभागाच्या कार्यालय जवळ आहेत.

दिवसेंदिवस गॅस सिलेंडर च्या वाढत्या किंमती मुळे आधीच घरगुती गॅस वापरणारे हैराण झाले आहेत.त्यात तालुक्यात उपलब्ध असलेले घरगुती गॅस सिलेंडर सर्रास हॉटेल व्यवसायिक वापरत आहेत.त्यांनी नियम नुसार व्यवसायिक सिलेंडर वापरले पाहिजे परंतु तसे न करता व्यवसायिक सिलेंडर हे जास्त भावाने मिळते व घरागुती गॅस सिलेंडर हे त्यापेक्षा कमी भावाने मिळत असल्याने हॉटेल व्यवसायिक सर्रास ते खरेदी करुन वापरत आहेत.या प्रकाराला आळा बसला पाहिजे अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here