चंद्रपूरातील जननायक बिरसा मुंडा स्मारकासाठी अशाेक तुमराम यांचे अन्नत्याग आंदोलन

0
471

चंद्रपूरातील जननायक बिरसा मुंडा स्मारकासाठी अशाेक तुमराम यांचे अन्नत्याग आंदोलन 

प्रशासनाने नाही पुरविले अद्याप लक्ष

चंद्रपूर, किरण घाटे विशेष प्रतिनिधी : बिरसा मुंडा चौक चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जननायक बिरसा मुंडा यांचा पुर्णाकृती पुतळा आदिवासी समाजाकडुन दि. २१फेब्रुवारीला स्थापित करण्यात आला होता. परंतु अतिक्रमणाचे कारण सांगुन महानगर प्रशासनाने त्या जागेवरुन ताे पुतळा हटविला. त्यामुळे साहजिकच आदिवासी समाजाच्या भावना दुखाविल्या गेल्या आहे .मनपा प्रशासनाच्या या अविचारी कृतीच्या निषेधार्थ दि. ५ मार्च २०२१ पासुन आदिवासी बांधवांचा बैठा सत्याग्रह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. परंतु या कालावधीत प्रशासनातर्फे पुतळा पुनर्स्थापित करण्याच्या द्रूष्टीकाेणातुन कुठलीही कार्यवाही झालेली नाही. स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी लागणाऱ्या ५४ चौरस मीटर जागेच्या हस्तांतरणाचे प्रकरण चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप प्रलंबित आहे. त्यावर कसल्याही प्रकारे विचार विनिमय न करता जमिन हस्तांतरण प्रक्रिया ही तशीच रखडलेली असल्याचे अशाेक तुमराम यांनी सांगितले .गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलन स्थळाला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार ,माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चंद्रपूरचे,विद्यमान आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधिर मुनगंटीवार,तथा चंद्रपूरातील काही सामाजिक संघटना व राजकिय पक्षांच्या पदाधिका-यांनी भेटी दिल्या आहे . काहीं मंडळीनी प्रत्यक्ष चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी निवेदने देवून चर्चा देखिल केली . आज या बैठा सत्याग्रहाला ११९ दिवस पुर्ण झाले आहेत. तरी देखील जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न सरकारी लालफितशाहीत अडकुन पडला आहे. जिल्हा प्रशासनाने अदिवासी जनतेच्या भावना लक्षात घेता जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रीया विनाविलंब करून स्मारकाच्या बांधकामास व सौंदर्यीकरणास ताबडतोब सुरूवात करावी अशी मागणी आदिवासी समाजाकडुन सातत्याने हाेत आहे. दरम्यान काल दुपार पासुन स्मारक समिती व जागर प्रतिष्ठान चंद्रपूर चे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी आपल्या अन्नत्याग आंदाेलनास आरंभ केला आहे. त्यांचे या आंदाेलनाला युवराज मेश्राम, जितेश कुळमेथे, प्रदिप गेडाम, मंगेश मडावी, साईराम मडावी, गणेश इसनकर, जितु सोनटक्के, शुभम मडावी, रंजना किन्नाके,या शिवाय वैशाली मेश्राम, प्रिती मडावी, जमुना तुमराम , कैलास पाटील , मनाेज मडावी , रमेश कटारे , बाबा महेशकर , विजय मेश्राम , गोविंद मित्रा , मधुकर काेटनाके , रमेश आड़े , लता पाेरेते , संगिता येरमे , अंकुश वाघमारे यांनी आपले समर्थन दिले आहे .जाे पर्यंत ही मागणी पदरात पडत नाही ताे पर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहील असा इशारा प्रशासनाला अशाेक तुमराम यांनी दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here