ग्राम पंचायत खड्संगी व पंचायत समिति चिमूर यांना माहिती अधिकार अर्जाची ‘ॲलर्जी’

0
253

ग्राम पंचायत खड्संगी व पंचायत समिति चिमूर यांना माहिती अधिकार अर्जाची ‘ॲलर्जी’

माहिती अधिकार अधिनियम २००५ कायद्याची पायमल्ली ?

चंद्रपुर : माहितीचा अधिकार म्हणजे शासकीय कार्यात पारदर्शकता यावी यासाठी सरकारकडुन माहिती मागण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय. भारतात – माहितीचा कायदा ११ मे २००५ मध्ये केंद्र सरकारने मंजुर केला. १२ ऑक्टोबर २००५ पासुन हा कायदा – अंमलात आला. भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद १९ – प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे. या हक्काचा भाग म्हणजेच माहितीचा अधिकार होय. लोक प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे खुप महत्वाचे स्थान आहे. प्रशासनातील अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अनियमितता या कायदामुळे उघडकीस आले आहेत.
ग्रामपंचायत खडसंगी व पंचायत समिति चिमूर गटविकास अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांनी तर ‘हम करे सो कायदा’ असा नविन नियम तयार केला आहे. माहिती अधिकारात अर्जदार पंचशील वाळके यानी ग्रामपंचायत ला एकून एकोणवीस अर्ज केले होते. त्या एकून एकोणवीस अर्जाला एकच उत्तर देण्यात आले. व जनमाहिती अधिकारी मोकळे झाले. माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कायद्या प्रमाने प्रत्येक अर्जाला ही वेगवेगडी माहिती अपेक्षित होती. परंतु अर्जदाराला समाधानकारक माहिती न पुरवता जन माहिती अधिकारी अर्धवट माहिती अर्जदाराला पत्र देवुन मोकळे होतात. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे प्रचार प्रमुख पंचशील वाळके यानि ग्रामपंचायत खड्संगी कडून पुरेपुर माहिती न मिडाल्याने प्रथम अपील अधिकारी पंचायत समिति चिमूर याना प्रथम अपील दाखल केली. त्यानी पण वेडेत माहिती न देता कायद्याची पायमल्ली केली. प्रथम अपील अधिकारी यांच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर याना २९/०९/२०२३ ला ऑनलाइन RTI अर्ज करुन माहिती मागितली असता, माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ७ (१) अन्वये अर्जदारास आपणास परस्पर पुरविन्यात यावी व उलट टपाली या कार्यालयास सादर करावा, असे पत्राद्वारे सांगुन सुद्धा न कडविल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता यानि नागपुर खंडपिठाकडे धाव घेतली व आपल्या न्यायासाठी द्वितीय अपील २२ डिसेम्बर २०२३ ला दाखल करण्यात आले.
द्वितीय अपिल दाखल केल्यानंतर निर्णयाला दोन वर्ष लागत असल्यामुळे काही जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी हा कायदा ‘नखे नसलेल्या वाघासारखा’ करुन ठेवला आहे असे लिहल्यास वावगे ठरणार नाही. हा सर्व प्रकार पंचशील वाळके यानी आपल्या संघटनेतील पदाधिकारी यांना संगीतला असता सर्व एकज़ुटीने लढून आंदोलन व उपोषण करू असे सांगन्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here