राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको – प्रकाश आंबेडकर

0
359

राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको – प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणप्रकरणी सर्वत्र चर्चा सुरु असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात २८८ पैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत.

त्यांचे एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध असून ते नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत.

श्रीमंत मराठे सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने लढत नाहीत.

त्यामुळे माझं गरीब मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला उतरायला हवं.

त्यांनी असं केलं तर त्यांना आरक्षण मिळेन अन्यथा त्यांनी आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत अंतरिम निकाल दिला यावरून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया मांडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here