कार्तिक नगर व तिलक नगर येथील विविध समस्या सोडवा

0
246

कार्तिक नगर व तिलक नगर येथील विविध समस्या सोडवा

वार्डवासियांची भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना निवेदनातून मागणी

घुग्घुस येथील तिलकनगर वार्डातील विविध समस्या सोडवा अशी मागणी वार्डवासियांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तिलक नगर वार्डात नाली भूमिगत करणे, नाली सफाई करणे, नळ जोडणी करून पाईप लाईन टाकणे, रस्त्यावर पथदिवे लावणे अशा विविध मागण्यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुस येथे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची वार्ड वासियांनी भेट घेतली व चर्चा केली भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन वार्डवासियांना दिले.

यावेळी विनोद जंजर्ला, वमशी महाकाली, कुणाल सरोज, अवी निहाल, डिगेश सोनबोई, रुद्र सेनापती, प्रेम दीप, करण कोलीयन, संघर्ष कोकरण, राजू चौधरी, विवेकानंद साहू, विमला निहाल, चेरो सेनापती, सुश्मिता सेनापती, सीता कोलीयन, विजया कोलीयन, चैतीबाई सोनबोई, सिमा कोलीयन व वार्ड वासिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here