महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या अमरावती विभागीय कार्याध्यक्ष पदी वणी तालुक्यातील उत्तम पाचभाई यांची निवड

0
502

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या अमरावती विभागीय कार्याध्यक्ष पदी वणी तालुक्यातील उत्तम पाचभाई यांची निवड

वणी/यवतमाळ, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात महसूल विभागाचा कणा शेतकरी शेत मजूरांचा महत्वाचा दुवा म्हटला तर कोतवाल हा समोर येतो. मानधनावर असलेला हा कोतवाल चतुर्थ श्रेणी पासून इंग्रज काळा पासून वंचित आहे. आत्तापर्यंत कोणत्याही शासनाने कोतवाल कर्मचारी यांना न्याय दिला नाही. कोतवाल हा तलाठी यांच्या अधिनिस्त असलेला महसूल कर्मचारी आहे. चावडीची दिवा बत्ती करणे, महसूली दवंडी देणे, टपाल वाटप करणे, गौण खनिज लक्ष ठेवणे, महसूल वसूल करणे, निवडणूक व नैसर्गिक आपत्तीमध्ये महत्वाची भूमिका कोतवाल बजावत असतो. अश्या या कोतवाल संघटनेची अमरावती विभागीय ऑनलाइन ZOOM बैठक दि. 20/6/2021 रोज रविवार ला झाली. त्यात अखेर बिनविरोध पाठींबा मिळवत अमरावती विभाग कार्याध्यक्ष पदाची माळ यवतमाळ जिल्ह्यातील वणी तहसिल कार्यालयाचे अष्टपैलु, सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले कोतवाल उत्तम पाचभाई यांच्या गळ्यात पडली. ते 2018 च्या भरती मधे शासन सेवेत रुजू झाले. मुळचे वणी तालुक्यातील संघटना बांधणीत, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या उकणी गावचे रहिवासी आहे. ते गुरुदेव प्रेमी असून सर्वसाधारण कुटुंबातील आहे. त्यांचा साज्या हा उकणी खंड 1 व कामाचा अनुभव पाहता जिल्हातून एकच नाव सूचवण्यात आले होते. सर्वांनी त्या नावाला पाठिंबा दर्शवत एकमतांनी निवड झाली.

विभागाला 4 ते 5 वर्षा नंतर नवीन विभागीय कार्यकारणी निवड झाल्याने सर्व कर्मचारी यांच्यात आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे. नवनिर्वाचित कार्याध्यक्ष यांच्या कडून संघटनेच्या तालुका व जिल्ह्यात तसेच विभागीय कामा बाबत व अडचणी सोडवण्या बाबत आशा अपेक्षा वाढल्या आहे.

यात यवतमाळ जिल्ह्याला अमरावती विभागीय कार्यकारणी मध्ये विशेष वणी तालुक्याला पद मिळाले असल्याने कोतवाल कर्मचारी यांच्यात आनंद उत्साह वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here