मुंगोली ओपन कास्ट पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मोरे तर मानद सचिवपदी अर्जुनकर यांची निवड

126

मुंगोली ओपन कास्ट पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मोरे तर मानद सचिवपदी अर्जुनकर यांची निवड


मुंगोली ओपन कास्ट कोल फिल्ड कर्मचारी सहकारी पत संस्थेची निवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडली यामध्ये संयुक्त पैनल(विमान चिन्हावर) 6 उमेदवार तर श्रमिक एकता सहकार पैनलचे (छत्री चिन्हावर ) 5 उमेदवार असे एकूण 11 सदस्य निवडून आले.

निवडून आलेल्या उमेदवारामधून संस्थेच्या उपविधी प्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव पदाची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी ला संस्थेच्या कार्यालयात अध्याशी अधिकारी शैलेश मडावी यांनी नवनिर्वाचित सदस्यांची सभा घेऊन निवडून आलेल्या उमेदवारामधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये अध्यक्ष पदासाठी उद्धव महादेव मोरे, उपाध्यक्ष पदासाठी पंजाब रमेश मोरे तर मानद सचिव पदासाठी प्रमोद मारोतराव अर्जुनकर यांची निवड करण्यात आली तर व्यवस्थापक समिती सदस्य म्हणून विजय बापूराव ताजने,सुधाकर नामदेव बोबडे,योगेश कृष्णराव पराते, बालाजी रामदास उपासे, सुनिल दयाराम वाघमारे, गणेश नागोबा रोडे,प्रांजली प्रकाश कोट्टे,व सोफिया कामिला हे राहणार आहे.विमान चिन्हाला स्पस्ट बहुमत मिळून सुद्धा पद मिळविण्यात अपयशी ठरले व छत्री चिन्हाचे बहुमत नसूनही विमान चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवाराला अध्यक्षपद देऊन दोन पद ताब्यात घेतले. यामध्ये प्रमोद अर्जुनकर यांची मानद सचिव पदाकरिता फेरनिवड करण्यात आली. यामुळे छत्री जिकंली विमान हरले अशी परिस्थिती झाली.

अध्याशी अधिकारी शैलेश मडावी यांनी ही पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उद्धव मोरे यांनी अध्याशी अधिकारी मडावी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच निवडून आलेल्या सर्व उमेदवाराचा सत्कार अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव यांचे हस्ते करण्यात आला.संस्थेचे व्यवस्थापक सुरेश खडसे यांनी संचालन केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित मानद सचिव प्रमोद अर्जुनकर यांनी मानले यावेळी नवनिर्वाचित सदस्य व संस्थेचे सभासद उपस्थित होते.

advt