ACC चांदा सीमेंट कंपनीचा विरोधात सफेद झंडा कामगार संघटनेचे आंदोलन सुरू

0
474

ACC चांदा सीमेंट कंपनीचा विरोधात सफेद झंडा कामगार संघटनेचे आंदोलन सुरू

 

ACC चांदा सीमेंट कंपनी नकोडा येथील न्यु पॅकिंग हाऊस ठेकेदार तिरुपती कंस्ट्रक्शन नितीन शर्मा यांनी गेल्या दहा वर्षांपासून कामगारांचा PF भरलेल्या नव्हता म्हणुन सर्व कामगारांनी मिळुन 5 जुन 2021 आठवडी बाजार घुग्घुस येथे चौदा तर 27 जानेवारी 2022 रोजी आठवडी बाजार नकोडा येथे 37 दिवस आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत ACC चांदा सीमेंट कंपनीने एक करोड पाच लाख रुपये PF कामगारांचा खात्यात जमा केला.

नंतर ACC कंपनी चा मॅनेजमेंटनी जे कामगार या आंदोलना मध्ये पुढे पुढे होते अशा कामगारांना टार्गेट करणे लावले होते त्या मधुन चार कामगारांना टार्गेट करून त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून कामावर घेणार असे कामगारांना ACC मॅनेजमेंट म्हणत होते.

परंतु या चार कामगारांचे कसलीही चुक नसताना या चार कामगारांना विनाकारण कामावरून कमी करण्यात आले असा आरोप सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटन यांनी लावला

PF हा ACC कंपनीने आणि ठेकेदाराने भरला नाही तर आणि त्याच्या विरोध कामगार करणार तर त्याच्यावर अत्याचार करणे हा कसला न्याय आहे.

त्या चार कामगारांना लवकरात लवकर कामावर घ्यावे आणि त्यांना जेव्हा पासून कामावरून बंद करण्यात आले तेव्हा पासुन तर आजपर्यंतचा पगार देण्यात यावे. ए. सी. सी. कंपनीने विनाकारण चार कामगारांना कामावरून कमी केल्याने त्यांना व त्यांच्या परिवाराला मानसिक व शारीरिक त्रास दिला त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सफेद झंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी केली जो पर्यंत चार कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे बेमुदत धरने आंदोलन आम्ही सुरुच ठेवणार दत्ता वाघमारे अशोक आसमपल्लिवार शरद पाईकराव अशोक भगत यांनी सांगितले यावेळेस जगदीश मारबते, राकेश पारशिवे ओम डोरलीकर, मंजुनाथ मडावी, अंकीत नालमवार, असे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here