माझ्या आदिवासी गडचिरोली जिल्हातील विविध गौरवगाथा

0
655

माझ्या आदिवासी गडचिरोली जिल्हातील विविध गौरवगाथा

कवितेच्या पंक्तीतून सादर करताना कविवर्य राकेश खेवले सर

गडचिरोली जिल्हा अमुचा आज
दिल्ली वरी दरारा।
कुणी घ्या प्रणाम। कुणी घ्या सलाम
अमुचा झाडीबोली वाडा।

अहेरीचा राजवाडा। आमटेंचा हेमलकसा।
लोकबिरादरी ची विद्यालये।
प्राणहिता वैनगंगा पामुलगौतम पार्लकोटा
गडचिरोलीचे जीवणालंय
गडचिरोली जिल्हा……..

भामरागड सिरोंचा वैरागड धानोरा
सुरजगडची लोहलये।
चमोर्शीची भातगिरणी। आष्टीची पपेरमिल।
मार्कंड्याची देवालये।

शूरवीरांची खान येथे।
गोंड राजाची शान येथे
नाही कशाची भीती आम्हास
वीर बाबुरावांमुळे

चारोळी ची चव लागे। आवळ्याचा वन येथे।
बांबूच्या वणाखाली । सागवनाच्या झाडाखाली
हिरवी शांती मिळे

कोरचीची जांभुळ वाडी। आरमोरीची कोसाकेंद्र
कुरखेड्यातील मधालये
बिनगुंडा धबधबा। संगम आहे त्रिवेणीचा
नयनरम्य मुतनूर दिसे।

वळसेचा कपडा बाजार। मूलचेऱ्याची चमचम वाडी।
एटापल्लीत खनिज असे
टिपगडचा सौंदर्यवाडा। कामलापूरचा हत्तीखाना।
पर्यटकांची दाटी येथे।

कुणी घ्या प्रणाम ।कुणी घ्या सलाम ।
असा दिसे गडचिरोली गौरव वाडा।

राकेश नामदेव खेवले
शिवाजी हायस्कूल चामोर्शी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here