भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा शाखा तर्फे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर राजुरा येथे संपन्न

0
418

भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा शाखा तर्फे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर राजुरा येथे संपन्न

राजुरा : भारतीय बौद्ध महासभा, तालुका राजुरा शाखा, शहर शाखा, ग्राम शाखा यांच्या मार्फत राजुरा येथील सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथे दिनांक ०४/०२/२०२३ रोज शनिवार ला समता सैनिक दल चे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. नंतर समता सैनिक दल ध्वज चे ध्वजारोहण आयु. धरमू किसन नगराळे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा तालुका राजुरा यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाच्या मेजर व बौध्द उपसाक व उपासिका यांनी ध्वजाला जय भीम म्हणून मानवंदना देण्यात आले.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. धर्मुजी नगराळे भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा, प्रमुख मार्गदर्शक आयु. प्रफुल भगत, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर, आयु. गुरुबालक मेश्राम जिल्हा सचिव भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये समता सैनिक दल म्हणजे काय? १) समता म्हणजे जात, धर्म, लिंगभेद, न्याय, हक्क, अंधश्रद्धा, स्वातंत्र्य, बंधुत्व सर्व व्यसनापासून अलिप्त अशा लोकांच्या समूह व विषमतेला नष्ट करून समता प्राप्त करणारी टोळी यास समता असे म्हणतात.
२) सैनिक म्हणजे देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे किवा समाजाचे सौरक्षण करणारा व स्वत: प्रशिक्षित शिस्तबध्द व लढाऊ शिक्षण घेतले असलेल्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. ३) दल म्हणजे लढाई करणारी टोळी किंवा सघटना यास दल असे म्हणतात. व या तीनही कार्यास मिळून समता सैनिक दल असे म्हणतात.

या समता सैनिक दलाची स्थापना दि. २० मार्च १९२७ साली महाड या ठिकाणी झाली. आणि राजुरा तालुका मध्ये आज दिनांक ०४/०२/२०२३ रोज शनिवार ला सम्यक बुध्द विहार सोमनाथ पूर वॉर्ड राजुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर” चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रस्ताविक व मनोगत आयु. भिमराव खोब्रागडे सचिव भारतीय बौद्ध महासभा राजुरा तर संचालन आयु. गौतम चौरे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा राजुरा तसेच आयु. गौतम देवगडे तालुका कोषाध्यक्ष, रामटेके, प्रीतीश देवगडे, हिमांशू गोवधन, धम्मदिप नगराळे, विनोद नीमसरकर, अंश जूनघरे, तेजस मालखेडे, शुभम खैरे, आयु.नी. सुनंदा रामटेके, किरण खैरे शहर कोषाध्यक्ष,भारती मून, वंदना देवगडे शहर उपाध्यक्ष, कमल टेकाडे, मंगला नळे, सोनाबाई कांबळे, शीतल ब्राह्मणे, प्रतीक्षा वासनिक, निशा भगत, रत्नमाला मावलीकर शहर उपाध्यक्ष, मालखेडे, तृप्ती दुर्गे, राणी नले, तक्षिका मालखेडे, स्वरा बारसागडे, पूर्वा बारसागडे, संगिनी मालखेडे, तृप्ती बारसागडे, पौर्णिमा ब्राम्हणे, निशा गावंडे, चंद्रकला झाडे, सुमनबाई नगराळे, माला तामगाडगे, सुजाता नळे शहर सरचिटणीस, मेघा बोरकर शहर अध्यक्षा, मायाताई लोखंडे इत्यादी उपासक व उपासिकानी समता सैनिक दल चे प्रशिक्षण मध्ये भाग घेतला नंतर सामूहिक सरणत्य घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here