‘तृणधान्य वापर आरोग्यदायी’ प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रीया उपक्रमातुन सक्षम व्हा – भाऊसाहेब बऱ्हाटे

0
474

‘तृणधान्य वापर आरोग्यदायी’ प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रीया उपक्रमातुन सक्षम व्हा – भाऊसाहेब बऱ्हाटे

कोरपना/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मोहीमे अंतर्गत कोरपना येथे कृषी विभागाद्वारे आयोजित अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उन्नयन शेतकरी चर्चासत्र कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरात भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी तृणधान्याचा वापर व उत्पादन घट झाल्याने व सतत रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमीनीच्या सुपिकतेवर व मानवाच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजाराने डोकेवर काढले आहे. तृणधान्य हे शरीरासाठी औषधी मात्रा असल्याने आहारात वापर आरोग्यदायी आहे. त्यामुळे लागवड क्षेत्र वाढ, शेती वस्तुप्रक्रीया विक्रीतून आर्थिक लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढे यावे असे आवाहन केले.

चन्द्रपुर वैनगंगा एफ पि ओ महासंघाचे ससंचालक आबीद अली यांनी शेतीमध्ये विकसित तंत्रज्ञान वापर करूण मिश्र पिक व अधिक उत्पादन घेण्यासाठी परिस्थीतीनुसार बदल करून शेती व्यवसाय कोणत्याही संकटात न थाबंता चालणारी प्रक्रीया आहे. हंगामनिहाय फळबाग, भाजीपाला, नर्सरीवन, औषधी धान्य प्रक्रिया मुल्य साखळी निर्माण करुन शेतकऱ्याना लाभ देण्यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ व्हावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीने पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी रविन्द्र डमाले यांनी प्रस्ताविकातुन शासनाचे विविध योजना लाभ घेण्यासाठी करावयाचे उपाययोजना अर्ज प्रक्रीया या बद्दल माहीती दिली. जाधव बालविकास अधिकारी प्रशांत भिमनवार दालमिया भारत फाऊंडेशन चे प्रतिनिधी नुतन लोनबडे शेतकरी उत्पादक कंपनी यांनी विचार मांडले. कार्यशाळेला ढोणे मंडळ अधिकारी, बोनसुले मॅडम उमेद, संदीप काकडे शेतकरी उत्पादन कंपनी पदाधिकारी शेतकरी मित्र, कृषी सहाय्यक, शेतकरी पुरुष, महिला मोठया संख्येनी उपस्थीत होते. आभार कृषी सहाय्यक केळझर यांनी मानले. तृणधान्य पासून तयार केलेल्या आहाराचा आस्वाद उपस्थीतांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here