मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0
508

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबई येथील बिर्ला हाऊस येथे भारतीय टपाल विभाग आणि उद्योगपती यश बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या एका विशेष आवरण आणि टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या एकसंघीकरणात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांचे मौलिक योगदान होते. या महात्म्यांचे वास्तव्य असलेल्या बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूमध्ये आज लोहपुरूष सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकता अखंडता कार्यास समर्पित करणारे विशेष डाक पाकिटाचे अनावरण करणे मी माझे भाग्य समजतो अशी भावना मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान विचारांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन केले. तसेच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कव्हर चे अनावरण आयोजित केल्याबद्दल भारतीय टपाल विभाग आणि बिर्ला कुटुंबियांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, यश बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष यश बिर्ला, आणि बिर्ला परिवरातील सदस्य, पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे तसेच भारतीय टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here