महामार्ग क्रमांक ०७ ते बोपापुर या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना दिले निवेदन

रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्या करिता होत आहे त्रास
हिंगणघाट, अनंता वायसे (०५ एप्रिल) । महामार्ग क्रमांक ०७ ते बोपापुर ता: हिंगणघाट या रस्त्याची बिकट परिस्थिती झाली असून निधी उपलब्ध करून देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ ते बोपापुर हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे हा रस्ता जवळपास अडीच किलोमीटरचा असून रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. त्यामुळे फायदा चालणे सुद्धा कठीण झाले आहे.या रोडवर पूर्णपणे पूल जीर्ण झाले असून खचले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याकडे कोणाचेही लक्ष नसून आपण जातीने लक्ष द्यावे अशी मागणी त्या वेळी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या वतीने करण्यात आली.
बोपापुर गावाजवळ डोमाघाट असून तेथे सोनामातेचे देवस्थान आहे पावसाळा संपल्यानंतर हिवाळा व उन्हाळ्यात भाविक भक्त सोनामातेच्या दर्शनासाठी याच मार्गाने जातात करतात. बोपापुर या गावाजवळ आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे देवस्थान आहे. तेथे भाविक भक्त ‘पुरण-पोळीचा’ स्वयंपाक करून नैव्यद्य बनवतात. राष्ट्रीय महामार्ग क्र ०७ ला बोपापुर हे गाव लागले असल्यामुळे आजनसरा देवस्थान ला जाण्यासाठी इतर जिल्ह्यातील भाविक भक्त या मार्गाने येणे जाणे करतात. त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसेच शाळेचे ,विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी याच रोडणे ये-जा करतात.
बोपापुर हे माझे नेटिव गाव असून रोड खूपच खराब झाला आहे तरी आपण जातीने लक्ष घालून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.