नगराध्यक्षा योगिता पिपरे पून्हा एकदा अपात्र

0
466

नगराध्यक्षा योगिता पिपरे पून्हा एकदा अपात्र

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
एक हाती सत्ता मिळवून नगराध्यक्ष पदी विराजमान होणाऱ्या योगिता पिपरे यांच्या वर आपल्या खाजगी वाहनात डीजल भरण्यासाठी नगर पालिकेच्या तिजोरीतून पैशे खर्च केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून आज अखेर नगर विकास खात्याचे मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदावरून पायउतार केल्याचे अधिकृत आदेश काढले आहे. गेल्या महिन्यात अपात्र आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय नागपूर येथे योगिता पिपरे यांनी केली होती. तेंव्हा न्यायालयाने पुन्हा एकदा १३ऑक्टोंबर ला सुनावणी घेऊन सुधारित आदेश २७ ऑक्टोंबर पर्यंत देण्याचे आदेश दिले होते. परंतू उशिरा का होईना न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याची चाहूल लागताच नगर विकास विभागाच्या वतीने आज नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सदर आदेशाबद्दल सविस्तर माहिती मुख्य अधिकारी नगर पालिका गडचिरोली यांचे कडून जाणून घेतली असता त्यांनी योगिता पिपरे यांना नगर विकास खात्याचे मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत आदेश मिळाले असल्याचा दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here