आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम त्वरीत द्या – आ. किशोर जोरगेवारांच्या चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांना सुचना 

0
490

आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम त्वरीत द्या – आ. किशोर जोरगेवारांच्या चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांना सुचना 
🟣🟢चंद्रपूर 🟣🟢किरण घाटे🟣
शासकीय आदिवासी वस्तीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांची रखडलेली डीबीटीची रक्कम तात्काळ अदा करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेवून केल्या आहे. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहण घूगे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नितेश बोरकुटे, प्रा. हितेश मडावी, शुभम उईके, मनोहर मेश्राम, शुभम मडावी यांच्यासह आदिवासी विद्यार्थी – विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

शासकीय आदिवासी वस्तीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांची जेवणाची सोय व शैक्षणीक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने डिबीटी च्या माध्यमातून आर्थिक मदत केल्या जात असते प्रवेशाच्या सात दिवसा आत ही रक्कम सदर विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षीत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता शैक्षणिक साहित्य व जेवणाची सोय याकरिता शासन धोरणानुसार डिबीटी ची रक्कम प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना जवळपास महिन्याभराचा कालावधी लोटूनही दिल्या गेलेली नाही. त्यामुळे अपेक्षित शैक्षणिक साहित्य व भोजन व्यवस्था याचा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामूळे ही मदत सदरहु विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.

आदिवासी मुला – मुलींचे शासकीय वसतिगृह कोविड -19 करीता हस्तांतरित करु नका – आ किशोर जोरगेवार

विद्यार्थ्यांची सुरु असलेली अंतिम परिक्षा लक्षात घेता आदिवासी शासकीय वसतिगृह कोविड – 19 करिता हस्तांरित करु नका अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे. काल शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली असून सदर सुचना केल्या आहे.
आर्थिकदृष्ट्या गरिब असलेल्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता शासकीय वसतिगृह पर्याय आहे. त्यातच आता अंतिम सत्राची परिक्षा सुरु आहे. अशा वेळी हे वसतिगृह कोविड -19 करीता हस्तांरित केल्या गेल्यास येथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन त्यांचे शैक्षणीक नुकसाण होण्याची शक्यता आहे. मागील शैक्षणीक सत्रात सुध्दा जवळपास 10 महिणे वसतीगृह विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध नव्हते. मात्र शासन निर्णयानूसार आता वस्तीगृह उपलब्ध करुन देण्यात आले असून नियमीत शैक्षणीक अध्यापन सुरु आहे. त्यामूळे आता पून्हा हे वस्तीगृह कोविड – 19 करिता हस्तांतरीत केल्यास विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेता वस्तीगृह कोविड – 19 करिता हस्तांतरीत करु नये अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here