भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार जनसंपर्क कार्यालयात वाहिली श्रद्धांजली

0
462

भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार जनसंपर्क कार्यालयात वाहिली श्रद्धांजली

चामोर्शी: गडचिरोली✍️ सुखसागर झाडे. 

हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा!

काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ!

गीत नया गाता हूँ!

या कवितेच्या ओळी ज्यांच्या जगण्याचे अधिष्ठान होते. ते भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आज पुण्यतिथी.

भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार असे त्यांचे खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

संघटना आणि सरकार दोन्ही आघाड्यांवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या दमदार नेतृत्वाची उमटलेली छाप आजही दृढ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा सहभाग होता.अटलबिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय जनसंघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास यशस्वीपणे केला.

संपूर्ण कार्यकाल पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलेले पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान म्हणून अटलजींचे वैशिष्ट्य निर्विवाद आहे. त्यांनी या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे आर्थिक व सामरिक निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत बलशाली राष्ट्र बनण्याकडे वाटचाल केली.

प्रेरणेचा अविरत स्रोत उत्कृष्ट संसदपटू भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करीत मनपूर्वक श्रद्धांजली वाहिली. गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारताचे लोकप्रिय पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज आमदार डॉ देवराव होळी यांच्या उपस्थितीत अभिवादन केले यावेळी प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष पिपरे तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे ,विकास मैत्र , युवा मोर्चा नेते प्रतीक राठी,लोमेश सातपुते ,दुलाल मंडल व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here