भारताच्या पांच्यातर व्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रम उत्साहाने साजरा..

0
576

भारताच्या पांच्यातर व्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रम उत्साहाने साजरा..

प्रमोद चौधरी

एरंडोल

प्रतिनिधी – एरंडोल-शहरात विविध शासकीय कार्यालये,शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिवस साधेपणाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्वच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते

एरंडोल तहसील (tahsiel ) कार्यालयात भारताच्या पांच्यातर व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day )ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा” या महाराष्ट्र शासनाने( state government ) सुरू केलेल्या महत्त्वाचे प्रकल्प (project )प्रचार-प्रसिद्धी करिता शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत एरंडोल शहर व एरंडोल भागातील सर्व गावांत रिक्षा स्पीकर द्वारे माहिती ( information )देण्यात येत आहे.येत्या आठवड्यात पूर्ण मंडळात प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.

प्रांताधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांचेसह सर्व महसूल कर्मचारी,विविध राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.रा.ति.काबरे विद्यालयात मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांच्या हस्यते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.दादासाहेब पाटील महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्राचार्य एन.ए.पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,प्राध्यापक उपस्थित होते.एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ.कांतीलाल काबरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमास प्राचार्या सरला विंचूरकर,उपप्राचार्या सरिता पाटील यांचेसह संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.

पातरखेडे (ता.एरंडोल) येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत भारतीय सैन्य दलातील जवान विजय नाना पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा पाटील,सचिव बबलू पाटील,संचालक अजय पाटील,मुरलीधर पाटील,जवान कांतीलाल बोरसे,मुख्याध्यापक विनोद कावडे यांचेसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.खडकेसिम (ता.एरंडोल) येथील महेंद्रसिंह धरमसिंह पाटील माध्यमिक विद्यालयात जवान सुरेश ताराचंद जोगी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी दहावीच्या परीक्षेत यश प्राप्त करणा-या विद्यार्थिनी मानसी पाटील,अश्विनी राठोड,साक्षी जाधव,प्रियांका राठोड यांचा संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मनोहर पाटील या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.डी.बी.पाटील यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,सरपंच सायली पाटील,नवल पाटील,बापू पाटील,नारायण पाटील,अशोक पाटील,लता पाटील,सुपडू राठोड,गुजर वंजारी यांचेसह ग्रामस्थ आणि शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here