आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपूस्तकांचे वाटप
बाबूपेठ येथील नवयुग शाळेतील ५वी ते ७ वी तील गरजू विद्यार्थ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने पाठ्यपूस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी नवयुवक शाळेतील मुख्याध्यापिका हर्षा तिराणकर, सहाय्यक शिक्षक बबिता रामटेके, रामेश्वर जिभकाटे, सारिका राचलवार, प्रियंका वैरागडे, काशिराम तोंडफोडे, स्नेहल राठोड, अमोल पालेकर, आदि शिक्षकांची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षण क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासह आता गरजू विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी मदतीचा हात पूढे केला आहे. गरिबीमूळे कोणाचेही शिक्षण सूटका होता कामा नये अशी त्यांची भुमीका असून त्या दिशेने त्यांनी कामही सुरु केले आहे. ईयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांच्या पूणे येथे शिक्षणाचा, राहण्याचा, पूर्ण खर्च एका संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या वतीने केल्या जात आहे. दरम्यान आता त्यांनी गरिब गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपूस्तक वाटप करण्याची मोहिम त्यांच्या वतीने सुरु करण्यात आली असून आज दि.१९ आँक्टोबर सोमवार रोजी त्यांच्या वतीने बाबूपेठ येथील नवयुग शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना पाठयपूस्तकांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शाळेतील जवळपास ७५ विद्यार्थ्यांच्या पाठ्यपूस्तकांचा खर्च श्री. माननीय आ. जोरगेवार यांनी उचलला आहे. आज येथील शिक्षकवृध्दांच्या उपस्थितीत त्यांच्या वतीने पाठ्यपूस्तक वितरीत करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांसह शिक्षकांनीही आ. जोरगेवार यांचे आभार मानले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे विलास सोमलवार, विलास वनकर, राशिद हूसैन, सलीम शेख, राहूल मोहुर्ले, चंदा इटनकर आदिंची उपस्थिती होती.
