इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न 

0
417

इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न 

चंद्रपूर ,राजूरा -किरण घाटे वि.प्र.

भारताच्या 75व्या स्वातंत्र्योत्सवा निमित्त राजूरा इन्फट जिसस सोसायटीच्या सर्व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ आँगस्ट २०२१ रोज रविवारला सकाळी ठिक ७ : ४५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते .या वेळी संस्थेचे संचालक अभिजित धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट जुनियर काॅलेजचे प्राचार्य समिर पठाण, कल्याण नर्सिंग काँलेजचे प्राचार्य पुजा गीते, इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी या सह शाळेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here