न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही.

0
406

न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही.

भीम आर्मीचे बोरकर यांचा निर्धार, उपोषण सुरू.

गडचांदूरातील घनकचरा महाघोटाळा प्रकरण पेटणार ?

गडचांदूर/प्रतिनिधी .प्रवीण मेश्राम
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी,नगराध्यक्षा,आरोग्य विभाग प्रमुख यांनी संगनमत करून खोट्या बिलांची रक्कम उचलून नगरपरिषदेच्या फंडाची अफरातफर केल्याचा आरोप करत येत्या 20 सप्टेंबर 2020 पर्यंत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा अन्यथा मला उपोषण आंदोलना सारखा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा “भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर” यांनी कोरपना तहसीलदारांमार्फत संबंधित वरिष्ठांना निवेदनातून दिला होता मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.अखेर 30 सप्टेंबर रोजी बोरकर यांनी गडचांदूर नगरपरिषदेच्या समोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असून “माझा जीव गेला तरी तरी चालेल पण आता न्याय मिळाल्याशिवाय माघर नाही” असा निर्धार बोरकर यांनी केले आहे.यामुळे आता घनकचरा प्रकरण पेटणार यात तिळमात्र ही शंका नाही.
शहरातील कचरा उचल करणे, घंटागाडीद्वारे घरोघरी ओला-सुखा कचरा गोळा करणे,त्याचे विलगीककरण करणे,सार्वजनिक शौचालय साफसफाई करणे,अशा विविध स्वच्छतेच्या कामांचा डीपीआर मंजूर करून निविदाही काढण्यात आल्या.सदरचे काम चंद्रपूर येथील “युवक कल्याण सुशिक्षीत बेरोजगार संस्थेला मागील वर्षी देण्यात आले.न.प.च्या हातगाडी 10,नवीन 6 टाटा एस गाड्या त्याच्या स्वाधीन करण्यात आले.काही महिने काम व्यवस्थीतरित्या सुरू होते.त्यानंतर मागील 6,7 महिन्यांपासून न.प.ने दिलेल्या हात गाड्या पूर्णपणे बंद केल्या व 6 टाटा एस गाड्याद्वारे काही मोजक्या भागातला कचरा उचलला जातो.ओला-सुखा कचरा विलगीकरण केल्या जात नाही. कमी कर्मचारी लावून काम चालवतात,नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन केराच्या टोपलीत टाकल्या जाते,शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.डेंग्यू मलेरीया सारख्या रोगांचे रुग्ण वाढत आहे.नुकतेच डेंग्यूमुळे आतापर्यंत चार निष्पाप लोकांचे बळी गेले आहे.सदर कंत्राटदाराकडून करारनाम्या नुसार कुठलेही काम होत नसल्याची तक्रारी होत असतानाही मुख्याधिकारी यांनी कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता उलट त्याचे बिल दिले.आश्चर्यची बाब म्हणजे याचे कंत्राट सुद्धा सुरू ठेवण्यात आले.
करारनाम्या नुसार त्याच्याकडून काम न घेता,परवाना काळ्या यादीत न टाकता कंत्राटदारा सोबत संगनमत करून करारनाम्यातील अटी व शर्तींना तिलांजली देत खोटे बिल तयार करून पुर्ण बिल कंत्राटदाराला देवून स्वतःचा स्वार्थ साधला असे आरोप बोरकर यांनी केले आहे.यावेळी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर भाऊ मून,जिल्हा प्रवक्ता जितेंद्र डोहने,जिल्हा महासचिव सुरेन्द्र रायपूर,चंद्रपूर शहराध्यक्ष प्रशांत रामटेके,जिल्हा उप प्रमुख रविन्द्र रायपूरे, शुभम गावई तालुका प्रमुख वरोरा यांची उपस्थिती होती.नगरसेवक अरविंद डोहे, संदीप शेरकी,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी,हेमंत वैरागडे, सैय्यद आबीद अली,रफीक निजामी,मनोज भोजेकर,अशोक उमरे, ईश्वर पडवेकरसह अनेक नागरिकांनी उपोषण मंडपाला भेट दिली.शासन बोरकर यांच्या उपपोषणाची दखल घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here