सात दिवसात म्हातारदेवी रोडचे काम सुरू करा अन्यथा आठव्या दिवशी आंदोलन…

0
494

सात दिवसात म्हातारदेवी रोडचे काम सुरू करा अन्यथा आठव्या दिवशी आंदोलन…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांचा इशारा

 

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी
घुग्घुस ते म्हातारदेवी रोडची अवस्था ही खुप वाईट परिस्थिती आहे. ज्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप मोठा त्रास सहण करावा लागत आहे. गाडीने जाणे काय पायदळ सुध्दा ये -जा करणे अशक्य झाले आहे. तडाली ते घुग्घुस हा सिमेंट रोडचे काम सुरू होऊन तब्बल तीन वर्षे पुर्ण झाली. परंतु ह्या रोडचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. तडाली ते लायडस मेटल कॉलनी इथपर्यंत रोडचे काम झालेले आहे. परंतु अद्याप म्हातारदेवी ते घुग्घुस या रोडचे काम सुरू केले नाही. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांनी चंद्रपूर चे उपविभागीय बांधकाम अभियंता शेट्टीवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

घुग्घुस ते म्हातारदेवी रोडचे काम सात दिवसात सुरू करा अन्यथा आठव्या दिवशी आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळेस योगेश नगराळे, मायाताई सांड्रावार, शरद पाईकराव, अशोक आसमपल्लिवार, ललित गाताडे, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, अशोक भगत, आदित्य सिंह, राकेश पारशिवे, सोनु फुलकर, ओम डोरलीकर, कुणाल कामतवार, अंकीत नालमवार, सिद्धार्थ गुडदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here